Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालिका कर्मचाऱ्यांना पितृत्व रजा; पत्नीच्या प्रसूती काळात दोन आठवड्यांची सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 06:20 IST

केंद्र सरकारच्या धर्तीवर महापालिकेतील पुरुष कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या पत्नीच्या प्रसूतीवेळी दोन आठवड्यांची पितृत्व रजा देण्याची ठरावाची सूचना महापालिकेच्या महासभेत शुक्रवारी एकमताने मंजूर करण्यात आली.

मुंबई : केंद्र सरकारच्या धर्तीवर महापालिकेतील पुरुष कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या पत्नीच्या प्रसूतीवेळी दोन आठवड्यांची पितृत्व रजा देण्याची ठरावाची सूचना महापालिकेच्या महासभेत शुक्रवारी एकमताने मंजूर करण्यात आली. ही ठरावाची सूचना पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे.गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत विभक्त कुटुंब पद्धती दिसून येत आहे. विभक्त कुटुंब पद्धतील गर्भवती स्त्रीच्या प्रसूतीच्या काळात तिची काळजी घेण्यासाठी कोणी अनुभवी व्यक्ती बरोबर नसते. त्यामुळे तिच्या पतीला मदतीसाठी तिच्याबरोबर राहणे गरजेचे असते. मात्र त्या पुरुष कर्मचाºयाला कार्यालयीन कामकाजामुळे सुट्टी घेऊन पत्नीच्या मदतीला घरी राहता येत नाही.मातृत्व लाभ अधिनियम लागू असलेल्या खासगी, सरकारी आणि महापालिकेतील महिला कर्मचाºयांना प्रसूती काळात २४ आठवड्यांची रजा देण्यात येते. मात्र पुरुष कर्मचाºयांना या काळात रजा मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होते. त्यामुळे बाळाची काळजी घेण्यासाठी केंद्रीय कर्मचाºयांना मिळणाºया पितृत्व रजेचा लाभ देण्याची मागणी शिवसेनेचे समाधान सरवणकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे पालिका महासभेत शुक्रवारी केली.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई