Join us  

Breaking : सस्पेन्स संपला; मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंग यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 12:35 PM

एसीबीचे महासंचालक परमबीर सिंग, सुरक्षा महामंडळाचे महासंचालक डी.कनकरत्नम

मुंबई - मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे आज सेवानिवृत्त होत असून त्यांच्यापदी कोणाची नियुक्ती केली आहे याबाबत शुक्रवारी म्हणजेच आज रात्रीपर्यंत झालेली नव्हती. अखेर, शनिवारी सकाळी त्याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे, नव्या आयुक्तांच्या नावाबाबतचा सस्पेन्स दूर झाला असून राज्य सरकारने परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. 

एसीबीचे महासंचालक परमबीर सिंग, सुरक्षा महामंडळाचे महासंचालक डी.कनकरत्नम आणि अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) रजनीश सेठ यांची नावे मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी चर्चेत होती. अखेर परमबीर सिंग यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. परमबीर सिंग हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबईच्या महासंचालकपदी रूजू होते. आता, मुंबई पोलीस आयुक्तपदी त्यांची बदली झाल्याने, त्यांच्याजागी लाचलुचपत विभागाचे अपर पोलीस महासंचालक बिपीन के. सिंग यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.  

दरम्यान, मावळते पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना शनिवारी सकाळी मुंबई पोलीस दलातर्फे भावुक आणि शुभेच्छा देत निरोप देण्यात आला. नायगावच्या मैदानावर पारंपरिक पद्धतीने हा निरोप संमारंभाचा कार्यक्रम पार पडला. 

टॅग्स :मुंबईपोलिसआयुक्त