मिलींद नार्वेकरांच्या चौफेर फटकेबाजीने परळकर झाले मंत्रमुग्ध!
By मनोहर कुंभेजकर | Updated: April 30, 2023 17:16 IST2023-04-30T17:16:29+5:302023-04-30T17:16:57+5:30
सध्या आयपीएल चा मोसम सुरू असून विविध संघातील देशी व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपट्टूच्या फटकेबाजीचा क्रिकेटरसिक आनंद घेत आहेत.

मिलींद नार्वेकरांच्या चौफेर फटकेबाजीने परळकर झाले मंत्रमुग्ध!
मुंबई: सध्या आयपीएल चा मोसम सुरू असून विविध संघातील देशी व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपट्टूच्या फटकेबाजीचा क्रिकेटरसिक आनंद घेत आहेत. मात्र आज शिवसेना सचिव (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) मिलींद नार्वेकर यांची चौफेर फटकेबाजी परळच्या नरेपार्क मैदानावर क्रिकेट रसिकांना बघायला मिळाली. त्यांनी लांब चेंडू भिरकवून दिले.तर डाव्या हाताने गोलंदाजीची देखिल त्यांनी चुणूक दाखवली. मिलींद नार्वेकरांच्या फटकेबाजीने आणि डावखुऱ्या गोलंदाजीने परळकर तर मंत्रमुग्ध झाले.
निमित्त होते ते खासदार मोहन रावले स्मृती चषक 2023 भव्य ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट सामने
येथे आयोजित केले आहे. परळ लालबाग आणि करीरोड विभागातील एकूण १६ संघ या स्पर्धेत सहभागी झाले. दोन दिवसीय या क्रिकेट सामन्यांचे मिलींद नार्वेकर यांनी उदघाटन केले.त्यांनी टॉस उडवला आणि प्रत्येक खेळाडूंशी हस्तालोंदन केले.
यावेळी खासदार व शिवसेना नेते अरविंद सावंत(शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे),विधिमंडळ गटनेते,आमदार अजय चौधरी,माजी महापौर महादेव देवळे,माजी महापौर श्रद्धा जाधव,माजी महापौर स्नेहल आंबेकर,भारतीय कामगार सेना चिटणीस निलेश भोसले,आयोजक मिनार नाटळकर व शिवडी विधानसभेतील पदाधिकारी उपस्थित होते.