प. रेल्वेच्या पाच फेऱ्या २६ जानेवारीपर्यंत रद्द

By Admin | Updated: January 12, 2015 02:11 IST2015-01-12T02:11:07+5:302015-01-12T02:11:07+5:30

पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल गाड्यांना काही ना काही कारणास्तव लेट मार्क लागत असतानाच आता फेऱ्या रद्द होण्याचीही भर पडणार आहे

Par. Five rounds of trains canceled till Jan 26 | प. रेल्वेच्या पाच फेऱ्या २६ जानेवारीपर्यंत रद्द

प. रेल्वेच्या पाच फेऱ्या २६ जानेवारीपर्यंत रद्द

मुंबई : पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल गाड्यांना काही ना काही कारणास्तव लेट मार्क लागत असतानाच आता फेऱ्या रद्द होण्याचीही भर पडणार आहे. बोरीवली स्थानकात तांत्रिक काम सुरू झाल्यामुळे बोरीवलीसाठी असणाऱ्या पाच लोकल फेऱ्या २६ जानेवारीपर्यंत रद्द करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. यामुळे बोरीवलीकरांची मोठी गैरसोय होणार आहे.
बोरीवली स्थानकात सहाव्या मार्गाचे काम केले जात आहे. गाड्यांचे आगमन एकाच वेळी होताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने ट्रॅकचेही काम केले जाणार आहे. हे पाहता बोरीवलीच्या पाच फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. यामध्ये वसईहून २३.२0 वाजता सुटून २३.४५ वाजता पोहोचणाऱ्या ट्रेनचा समावेश आहे. त्याचबरोबर बोरीवलीहून २३.५३ वाजता सुटून नालासोपारात 00.२५ वाजता, अंधेरीहून ४.१0 वाजता सुटून बोरीवलीत ४.३२ वाजता पोहोचणारी, बोरीवलीहून ४.४२ वाजता सुटून चर्चगेट येथे ५.४३ वाजता पोहोचणारी आणि बोरीवलीहून ५.0६ वाजता सुटून विरार येथे ५.४२ वाजता पोहोचणाऱ्या ट्रेनचा समावेश असल्याचे पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी गजानन महतपूरकर यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Par. Five rounds of trains canceled till Jan 26