पनवेलात साथीच्या आजाराची लागण
By Admin | Updated: January 14, 2015 22:56 IST2015-01-14T22:56:19+5:302015-01-14T22:56:19+5:30
गेल्या काही दिवसांपासून थंडीमध्ये अचानकपणे वाढ झाल्याने त्या वातावरणाचा परिणाम ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर प्रामुख्याने होताना दिसत आहे.

पनवेलात साथीच्या आजाराची लागण
पनवेल : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या अचानक बदलामुळे त्याचा परिणाम पनवेल परिसरातील नागरिकांवर होत असून सध्या सर्दी, खोकला, ताप तसेच हातपाय दुखणे आदी त्रास अनेकांना होत असल्याने खाजगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात या प्रकारचे रुग्ण उपचार घेताना आढळत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून थंडीमध्ये अचानकपणे वाढ झाल्याने त्या वातावरणाचा परिणाम ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर प्रामुख्याने होताना दिसत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुले, सर्दी, खोकला व ताप या आजाराने त्रस्त झाली आहेत. (वार्ताहर)