Join us  

पंकजा-धनंजय यांच्यात जुंपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 4:34 AM

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात चांगलीच जुंपली असून, पैसे मागितल्याच्या आरोपावरून उभयतांमध्ये खडाजंगी झाली.

मुंबई : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात चांगलीच जुंपली असून, पैसे मागितल्याच्या आरोपावरून उभयतांमध्ये खडाजंगी झाली.विधिमंडळात लक्षवेधी न जेऊ देण्याच्या बदल्यात धनंजय मुंडे यांनी पैसे मागितल्याचे वृत्त ‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीवर मंगळवारी दाखविण्यात आले. या संदर्भात विधान परिषदेत स्पष्टीकरण देताना मुंडे यांनी पंकजा यांच्या स्वीय सहायकाने एका कामासाठी ५० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला. पुराव्यादाखल आपल्याकडे एक सीडी असल्याचा दावाही त्यांनी केला. तर हे कटकारस्थान असून आपल्या स्वीय सहायकाने पोलिसात तक्रार दाखल केल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.वृत्तवाहिनीला हाताशी धरून हा कट रचला असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. सत्ताधाºयांकडून हे राजकारण सुरू झाले आहे. मात्र, त्याचा शेवट मी करणार. सरकारमधल्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची रोज एक क्लिप आपण उघड करणार, असा इशारा मुंडे यांनी दिला आणि लगेचच त्यांनी ग्रामविकासमंत्र्यांच्या पीएकडून ५० लाख रुपये मागितले जात असल्याचा आरोप करत, एक सीडी सभागृहात सादर केली.यावर पंकजा मुंडे यांनी तत्काळ स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या, आपले पीए प्रदीप कुलकर्णी यांना गुंतविण्यासाठी ही सीडी केली आहे. या प्रकरणाची आठवड्याभरात सखोल चौकशी करावी, अशी विनंती मी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. ही सीडी कोणी तयार केली व विरोधी पक्षनेत्यांना कोठून मिळाली, हे त्यांनी जाहीर करावे. त्यामुळे अधिक सखोल चौकशी करता येईल, असे पंकजा म्हणाल्या. त्यावर या सीडीचा स्रोत आपल्याला माहीत आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले व ती सीडी त्यांनी सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे सुपुर्द केली.

टॅग्स :पंकजा मुंडेधनंजय मुंडे