टॅक्सीत ‘पॅनिक बटण’!

By Admin | Updated: December 11, 2014 02:34 IST2014-12-11T02:34:32+5:302014-12-11T02:34:32+5:30

दिल्लीत टॅक्सीचालकाकडून झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर मुंबईत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खासगी टॅक्सीत ‘पॅनिक बटण’ बसवण्याचा पर्याय समोर आला आहे.

'Panic Button' in Taxi! | टॅक्सीत ‘पॅनिक बटण’!

टॅक्सीत ‘पॅनिक बटण’!

सुरक्षेसाठी नवा पर्याय : खासगी टॅक्सी कंपन्या, आरटीओ तयार
मुंबई : दिल्लीत टॅक्सीचालकाकडून झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर मुंबईत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खासगी टॅक्सीत ‘पॅनिक बटण’ बसवण्याचा पर्याय समोर आला आहे. प्रवासी आपल्या सुरक्षेसाठी हे बटण दाबून सर्वोतोपरी प्रयत्न करू शकतो. 
त्यासाठी पोलीस, वाहतूक पोलीस आणि संबंधित टॅक्सी कंपनीच्या कॉल सेंटरशी ही यंत्रणा जोडणो आवश्यक असल्याचे मत आरटीओ आणि खासगी टॅक्सी कंपन्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले. त्यावर अजून शिक्कामोर्तब झाले नसले तरी टॅक्सी कंपन्या आणि आरटीओ या पर्यायासाठी उत्सुकता दाखवत आहेत. हे बटण प्रवासी आसनावर किंवा त्याच्या मागे व बाजूलाच असावे, जेणोकरून एखादा बाका प्रसंग प्रवाशावर उद्भवल्यास त्या बटणाचा वापर प्रवासी करू शकतो. 
 
पॅनिक बटणाचा पर्याय उत्तम असला तरी याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात अनेक अडचणी येऊ शकतात. कारण यात अनेक तांत्रिक बाबी आहेत. म्हणूनच सध्या हे बटण एक पर्याय म्हणूनच समोर आल्याचे परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिका:याने सांगितले. 
 
या बटणाचा वापर केल्यास त्या टॅक्सीची संपूर्ण लाइट सतत पेटत राहणो, हॉर्न वाजणो असे प्रकार होतील; जेणोकरून टॅक्सीच्या जवळून जाणा:या अन्य वाहनांना टॅक्सीतील घटनेची माहिती समजेल आणि पुढील अनर्थ टळण्यास मदत मिळेल. त्याचप्रमाणो हे बटण दाबल्यास घडणा:या प्रसंगाची माहिती पोलीस, वाहतूक पोलीस आणि संबंधित टॅक्सी कंपनीच्या कॉल सेंटरलाही मिळण्यास मदत मिळेल. 
 
राज्यात वेब कॅबवर बंदी? राज्यात धावणा:या वॅब कॅबवर बंदी आणण्याचा विचार केला जात आहे. तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. -वृत्त/3

 

Web Title: 'Panic Button' in Taxi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.