पन्हाळघर पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

By Admin | Updated: February 13, 2015 22:29 IST2015-02-13T22:29:59+5:302015-02-13T22:29:59+5:30

शासनाची अनास्था व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे माणगाव तालुक्यातील पन्हाळघर येथील नदीवरील पडलेल्या पूलबांधणीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

Panhala bridge waiting for bridge repair | पन्हाळघर पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

पन्हाळघर पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

पूनम धुमाळ, गोरेगाव
शासनाची अनास्था व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे माणगाव तालुक्यातील पन्हाळघर येथील नदीवरील पडलेल्या पूलबांधणीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.
जुलै २०१४ मध्ये हेटवणे पन्हाळघर येथील नदीवरील हा पूल पावसाळ्यात अचानक कोसळला. नदीपलीकडचा भाग डोंगराळ असून, त्या गावाकडे जाण्यासाठी पक्का मार्ग नसल्याने नदीवर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ सातत्याने करीत आहेत. त्याबाबत शासनाकडे लेखी निवेदनही देण्यात आले आहे.
पुलाच्या पुनर्बांधणीसाठी बांधकाम विभागाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आले. पण, अजून पूल काही मार्गी लागलेला नाही. पुलापलीकडच्या शेतीवर, तसेच इतर गावात जाण्यासाठी केवळ एकच मार्ग आहे. त्यावरील पूल कोसळताच पर्यायी मार्ग म्हणून मातीचे पोते टाकून ग्रामस्थांनी पर्यायी मार्ग तयार केला, मात्र तो सुरक्षित नाही. पावसाळ्यात मार्गावरील एका मोरीला पुराचा वेढा पडत असतो. पूल नसल्याने ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, पत्रे देऊनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही, असे पन्हळघर सरपंच पंढरी शेडगे यांनी सांगितले.

Web Title: Panhala bridge waiting for bridge repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.