पान २....स्वाइन फ्लूची दहशत कायम

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:14+5:302015-02-18T00:13:14+5:30

स्वाइन फ्लूची दहशत कायम

Pan 2 ... Swine Flu Panic | पान २....स्वाइन फ्लूची दहशत कायम

पान २....स्वाइन फ्लूची दहशत कायम

वाइन फ्लूची दहशत कायम
मुंबईत आढळले ३० रुग्ण, पाच लहानग्यांचा समावेश
मुंबई : स्वाइन फ्लूची दहशत अजूनही कायम असून गेल्या २४ तासांत मुंबई शहर-उपनगरात ३० नवे स्वाइन फ्लू रुग्ण आढळले आहेत. त्यात पाच लहानग्यांचाही समावेश आहे. त्यामुळे त्यामुळे स्वाइन फ्लूच्या साथीने नागरिकांची चिंता वाढली आहे.
सोमवारी मुंबईत स्वाईन फ्ल्यूचा पहिला बळी नोंदवण्यात आला. तर अंधेरीतल्या एका ५० वर्षीय रुग्णाचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. स्वाईन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारची आरोग्य यंत्रणाही कामाला लागली आहे.
शासनाकडून स्वाइन फ्लूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असले, तरी स्वाइन फ्लूची दहशत कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईप्रमाणेच तसेच, राज्याच्या अन्य भागातही स्वाइन फ्लूचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. मुंबईबाहेरील सात रुग्ण मुंबईतील खासगी आणि पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यात एका १० महिन्याच्या मुलाचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
.................................................


Web Title: Pan 2 ... Swine Flu Panic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.