‘इबोला’साठी पालिका सज्ज
By Admin | Updated: August 9, 2014 02:34 IST2014-08-09T02:34:31+5:302014-08-09T02:34:31+5:30
इबोला व्हायरस डिसीज (ईव्हीडी) हा पश्चिम आफ्रिकेच्या 4 देशांमध्ये पसरलेला आजार आहे. मुंबईमध्ये अजून या आजाराने ग्रस्त असलेला एकही रुग्ण आढळलेला नाही.

‘इबोला’साठी पालिका सज्ज
>मुंबई : इबोला व्हायरस डिसीज (ईव्हीडी) हा पश्चिम आफ्रिकेच्या 4 देशांमध्ये पसरलेला आजार आहे. मुंबईमध्ये अजून या आजाराने ग्रस्त असलेला एकही रुग्ण आढळलेला नाही. या आजाराचा प्रादुर्भाव मुंबईत झालेला नसला तरी हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे मुंबई महापालिकेने खबरदारी म्हणून काही उपाययोजना आखलेल्या आहेत.
पश्चिम आफ्रिकेच्या नायजेरिया, जिनिआ, लिबिया, सिइरा या देशांमध्ये या आजाराचा संसर्ग जास्त प्रमाणात झालेला आहे. मुंबईमध्ये ईव्हीडीने ग्रस्त असलेला रुग्ण येऊ नये म्हणून मुंबई महापालिकेने आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संपर्क साधलेला आहे. एखादा प्रवासी गेल्या 2क् दिवसांमध्ये या चार देशांतून आलेला असेल आणि ताप, अंगदुखी, डायरिया, अशक्तपणा अशी काही लक्षणो त्याच्यात दिसली, तर त्याच्या रक्ताचे नमुने घेतले जाणार आहेत. या रुग्णाला जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे. रक्ताचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. एखादा रुग्ण आढळल्यास त्याला कस्तुरबा अथवा जे.जे. रुग्णालयात हलविण्यात येईल. कस्तुरबा रुग्णालयात वेगळ्या 1क् खाटा तयार ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली.
जे.जे. आणि कस्तुरबामध्ये ईव्हीडी रुग्णांसाठी विशेष सोय करण्यात आलेली आहे. हा व्हायरस 2 तासांत किंवा 2क् दिवसांर्पयत आजाराची लागण करू शकतो. यामुळेच या चार देशांतून आलेल्या एखाद्या प्रवाशामध्ये एखादी लक्षणो आढळून आली, मात्र त्याची रक्ततपासणी पॉङिाटिव्ह आली नाही, तर त्या प्रवाशाचा संपर्क क्रमांक घेतला जाणार आहे. यानंतर पुढचे 2क् दिवस त्याच्या संपर्कात राहून त्याची तपासणी करण्यात येणार आहे, असे डॉ. केसकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)