पालघरला कॅबिनेट ठाण्याला मात्र ठेंगा
By Admin | Updated: October 31, 2014 22:57 IST2014-10-31T22:57:38+5:302014-10-31T22:57:38+5:30
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत अशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्री मंडळाची घोषणा शुक्रवारी झाली.
पालघरला कॅबिनेट ठाण्याला मात्र ठेंगा
ठाणो : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत अशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्री मंडळाची घोषणा शुक्रवारी झाली. त्यात नवख्या व अवघे दोन भाजपा आमदार निवडून देणा:या पालघर जिल्ह्याला सावरांच्या रुपाने कॅबिनेट मंत्रीपद तर सात आमदार निवडून देणा:या ठाण्याच्या वाटेला ठेंगा आला आहे.
संजय केळकर किंवा रवींद्र चव्हाण यापैकी एकाला नक्की संधी मिळेल अशी चर्चा होती. परंतु, पहिल्या यादीमध्ये त्या दोघांचाही समावेश झाला नाही. त्यामुळे ठाणो जिल्ह्यात नाराजी निर्माण झाली आहे. विस्तारमध्ये तरी जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रपद लाभेल अशी जिल्हावासियांची अपेक्षा आहे.
कोअर कमिटीच्या प्रारंभीच्या चर्चेनुसार ठाण्याला एक कॅबिनेट मंत्रीपद देण्याचे प्रस्तावित होते. त्यासाठी चव्हाण, केळकर ही नावे चर्चेत होती. परंतु राजकीय अपरिहार्यतेमुळे पहिल्या टप्यातील प्रस्तावित असलेल्या 15 जणांचे मंत्रीमंडळ अवघ्या 1क् जणांचे करणो भाग पडले. महाराष्ट्रात जास्तीतजास्त 42 मंत्री करता येतात. असे असले तरी मित्रपक्ष, अपक्ष यांच्या सोबत जर सेनेचे ही पाय धरण्याची वेळ आलीच तर या सगळ्य़ांना काही मंत्रीपदे देण्याच्या झमेल्यामुळे पहिल्या टप्प्यातील मंत्र्यांची संख्या शक्य तेवढी कमी ठेवावी. असा विचार
प्रवाह बळावला आणि पहिल्या टप्प्यातील मंत्र्यांची संख्या 1क् वर आली. त्यातून ठाण्याचा आणि केळकरांचा पत्ता कट झाला. कारण या जिल्ह्यात भाजपाचे सर्व आमदार पहिली किंवा दुसरी टर्म मिळविलेले आहेत. आणि बहुतेक तरुण आहेत. तर काही अन्य पक्षातून आलेले आहेत. (विशेष प्रतिनिधी)
4एक शक्यता तरी अशी आहे की, सेनेचा मंत्रीमंडळात सहभाग निश्चित झाला तर ठाण्यातून फक्त एकनाथ शिंदेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल व केळकर आणि चव्हाणांना राज्यमंत्री पदावर समाधान मानावे लागेल.
4कोणत्या का पक्षाच्या आमदारामुळे असो ठाण्याला कॅबिनेट मंत्रीपदाचा टिळा आव्हाडांच्या नंतर पुन्हा लागो आणि घोलप, साबीर शेख, जगन्नाथ पाटील, गणोश नाईक, नकुल पाटील अशी लाल दिव्याची परंपरा अखंडीत राहो अशी ठाणोकरांची इच्छा आहे.