पालघर-स्वारगेट एसटीला अपघात

By Admin | Updated: September 26, 2014 01:18 IST2014-09-26T01:18:18+5:302014-09-26T01:18:18+5:30

मनोर-वाडा रोडवर सकाळी ९.३० वा. च्या सुमारास पुढे जाणाऱ्या डंपरला मागुन पालघर-पुणे स्वारगेट बसने धडक दिली मात्र प्रवाशांना कोणताही प्रकारची इजा झाली

Palghar-Swargate ST accident | पालघर-स्वारगेट एसटीला अपघात

पालघर-स्वारगेट एसटीला अपघात

मनोर : मनोर-वाडा रोडवर सकाळी ९.३० वा. च्या सुमारास पुढे जाणाऱ्या डंपरला मागुन पालघर-पुणे स्वारगेट बसने धडक दिली मात्र प्रवाशांना कोणताही प्रकारची इजा झाली नाही. परंतु बसचा पुढील भागाचे नुकसान झाले. हा अपघात एस.टी बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविले जात आहेत.
मुंबईमध्ये बेस्टी आणि ग्रामीण भागात एस.टी दोन्ही बस चालक प्रवासी घेऊन रस्त्यावरून सुसाट वेगात धावतात. त्यांना लहान वाहन चालकांची व बसलेले प्रवाशांची क गाडीतील प्रवाशांची कोणतीही पर्वा नसते. रस्त्यावरचे ते स्वत:ला राजे समजतात. म्हणून संबंधीत खात्याने त्या चालकावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. पालघरवरून पुणे-स्वारगेट साठी निघालेली बस सकाळी ९.३० च्या सुमारास मनोर-वाडा रस्त्यावर टेन गावच्या हद्दीत समोर जाणाऱ्या एका अनोळखी डंपरला मागुन ठोकर दिली. ठोकर दिल्याने बसच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले. मात्र प्रवाशांना किरकोळ मार लागला. कोणीही गंभीर जखमी झालेले नाही.

Web Title: Palghar-Swargate ST accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.