खड्ड्यांमुळे पालघर-सावरे एसटी बंद

By Admin | Updated: August 12, 2014 00:23 IST2014-08-11T23:50:13+5:302014-08-12T00:23:06+5:30

पहिल्या पावसात दुर्वेस-सावरे-पाचोधारा या ९ किमी रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे एसटी बस बंद झाली आहे

Palghar-Saware ST closed due to potholes | खड्ड्यांमुळे पालघर-सावरे एसटी बंद

खड्ड्यांमुळे पालघर-सावरे एसटी बंद

आरिफ पटेल, मनोर
पहिल्या पावसात दुर्वेस-सावरे-पाचोधारा या ९ किमी रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे एसटी बस बंद झाली आहे. तेथील विद्यार्थ्यांना मनोर येथे शाळेत येण्यासाठी दुर्वेसपर्यंत ९ किमी पायी प्रवास करावा लागत आहे, तसेच पालघर - मनोर परिसरातील शिक्षकांना सावरे -पाचोधारा - ऐबूर -पाटील पाडा शाळेत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे, मात्र सार्वजनिक बांधकाम खाते पालघर व ठाणे जि. प.चे अधिकारी मूग गिळून गप्प बसले आहेत.
ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने पालघर जिल्हा पूर्व आदिवासी गावातील रस्ते निकृष्ट दर्जाचे तयार करण्यात आल्याचा आरोप होत आहे. पहिल्या पावसातच रस्ते उखडून धुवून गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातला एक भाग म्हणून अतिदुर्गम आदिवासी दुर्वेस ते सावरे पाचोधारा हा रस्ता नव्याने केला होता, परंतु पहिल्या पावसातच हा रस्ता धुवून गेला आहे. या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत. पाचोधार - सावरे पालघर एसटी गेल्या चार दिवसांपासून महामंडळ विभागाने बंद केली आहे.

Web Title: Palghar-Saware ST closed due to potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.