पालघरला आज आरक्षण सोडत
By Admin | Updated: February 10, 2015 22:38 IST2015-02-10T22:38:46+5:302015-02-10T22:38:46+5:30
वसई पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण बुधवारी जाहीर होणार आहे. पालघर जिल्ह्यातील एकूण ८ पंचायत समित्यांपैकी पालघर

पालघरला आज आरक्षण सोडत
वसई : वसई पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण बुधवारी जाहीर होणार आहे. पालघर जिल्ह्यातील एकूण ८ पंचायत समित्यांपैकी पालघर व वसई या दोन पंचायत समित्या अंशत: अनुसूचित क्षेत्रात आहेत. उर्वरीत ६ या पूर्णपणे अनुसूचित क्षेत्रात असल्यामुळे याठिकाणी सर्व सभापती पदे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत.
पालघर व वसई पंचायत समित्यांची सभापती पदे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. त्यापैकी महिलांच्या ५० टक्के आरक्षण धोरणानुसार २ पैकी १ पद मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. वसई पंचायत समितीचे सभापतीपद जर महिलांसाठी आरक्षित झाले तर बहुजन विकास आघाडीच्या पंचायत समिती सदस्या चेतना मेहेर यांना लॉटरी लागण्याची शक्यता आहे. आणि हे पद महिलांसाठी आरक्षित न झाल्यास जयप्रकाश ठाकूर यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.