पालघरची पोटनिवडणूक १० जुलैनंतर?

By Admin | Updated: June 19, 2015 00:09 IST2015-06-19T00:09:53+5:302015-06-19T00:09:53+5:30

महानगरपालिका निवडणुकीनंतर आता पालघर विधानसभा निवडणुकीचे वेध सुरू झाले आहेत. गेल्या निवडणुकीमधील विजयी उमेदवाराविरोधात मुंबई

Palghar by-election on July 10? | पालघरची पोटनिवडणूक १० जुलैनंतर?

पालघरची पोटनिवडणूक १० जुलैनंतर?

वसई : महानगरपालिका निवडणुकीनंतर आता पालघर विधानसभा निवडणुकीचे वेध सुरू झाले आहेत. गेल्या निवडणुकीमधील विजयी उमेदवाराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यामुळे ही निवडणूक स्थगित करण्यात आली होती. १० जुलै रोजी सुनावणीनंतर निवडणूक होण्याची शक्यता आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत सेनेचे उमेदवार कृष्णा घोडा यांनी काँग्रेसचे राजेंद्र गावित यांचा पराभव केला होता. यानंतर गावित यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. निवडणूक अर्ज भरताना सेनेचे कृष्णा घोडा यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात कमी मालमत्ता दाखवल्याचा दावा गावित यांनी केला होता. त्यानंतर २४ मे रोजी आमदार घोडा यांचे निधन झाले. निवडणूक आयोगाने या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर केली. परंतु निवडणूक आयोगाने लगेच या निवडणुकीला स्थगिती दिली. या याचिकेवर १० जुलै रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान गावित हे सदर याचिका मागे घेतील अशी शक्यता आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम कधीही जाहीर होऊ शकतो. हा अंदाज लक्षात घेऊन सेना, काँग्रेस व बहुजन विकास आघाडींनी आपली व्यूहरचना करण्यास सुरूवात केली आहे. गेल्यावेळी गावित यांचा निसटता पराभव झाला होता. तर, दुसरीकडे महानगरपालिका निवडणुकीत मिळालेले प्रचंड यश लक्षात घेऊन बहुजन विकास आघाडी यावेळी प्रचारामध्ये कोणतीही कसर ठेवणार नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Palghar by-election on July 10?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.