पालघर जिल्ह्याला अद्याप ‘जिल्हा अधीक्षक’ भूमी अभिलेख नाही
By Admin | Updated: December 3, 2014 23:52 IST2014-12-03T23:52:39+5:302014-12-03T23:52:39+5:30
ब्रिटिशांनी सुरू केलेल्या व अद्यापही त्यास अत्यंत महत्त्व असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयाचे जिल्हा अधीक्षकपद पालघर जिल्ह्यासाठी मंजूर केले नसल्याचे उघड झाले आहे

पालघर जिल्ह्याला अद्याप ‘जिल्हा अधीक्षक’ भूमी अभिलेख नाही
ठाणे : ब्रिटिशांनी सुरू केलेल्या व अद्यापही त्यास अत्यंत महत्त्व असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयाचे जिल्हा अधीक्षकपद पालघर जिल्ह्यासाठी मंजूर केले नसल्याचे उघड झाले आहे. यामुळे या जिल्ह्याची जबाबदारी ठाण्याचे जिल्हा अधीक्षक पार पाडत आहेत. या कार्यालयाच्या जागेसाठी अद्यापही शोधाशोध सुरू आहे.
ठाणे जिल्हा विभाजनानंतर पालघर, वसई, जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, डहाणू आणि तलासरी या आठ तालुक्यांचा पालघर जिल्ह्यात समावेश करण्यात आला. या तालुक्यांमध्ये बहुतांशी ठिकाणी असलेले भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी, कर्मचारी या जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. पण, जिल्हा अधीक्षकपद मात्र मंजूर करण्यास राज्य शासनाने विलंब केला असल्याने शेतकऱ्यांसह विकासकांमध्ये तीव्र नापसंती आहे. (प्रतिनिधी)