दादरमध्ये कोठडीतील गुन्हेगाराचा न्यूमोनियाने मृत्यू
By Admin | Updated: August 1, 2015 02:31 IST2015-08-01T02:31:42+5:302015-08-01T02:31:42+5:30
१८ लाखांच्या घरफोडीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचा क्षयरोगाबरोबर न्यूमोनिया झाल्याने मृत्यू झाला. संदीप दळवी (२०) असे मृत आरोपीचे नाव आहे.

दादरमध्ये कोठडीतील गुन्हेगाराचा न्यूमोनियाने मृत्यू
मुंबई : १८ लाखांच्या घरफोडीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचा क्षयरोगाबरोबर न्यूमोनिया झाल्याने मृत्यू झाला. संदीप दळवी (२०) असे मृत आरोपीचे नाव आहे.
घाटकोपर येथील रहिवासी असलेला दळवी सराईत गुन्हेगार होता. दादर येथील एका १८ लाखांच्या घरफोडीप्रकरणी २९ जुलै रोजी दळवीला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने दळवीला १ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. गुरुवारी सायंकाळपासून दळवी जास्त खोकत असल्याने त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. दळवीला क्षयरोग असल्याचे समोर आले. त्यात त्याला न्यूमोनियानेही ग्रासले होते. प्रकृती खालावल्याने गुरुवारी मध्यरात्री उपचारादरम्यान दळवीचा मृत्यू झाला.