‘पेज थ्री’ संस्कृती मुंबईत नको!

By Admin | Updated: March 26, 2015 01:56 IST2015-03-26T01:56:33+5:302015-03-26T01:56:33+5:30

मुंबईत पेज थ्री कल्चर रुजविण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ मात्र ही मुंबईची संस्कृती नव्हे़ त्यामुळे आपली संस्कृती जपण्यासाठी मुंबईत पेज थ्री कल्चरला थारा देऊ नये,

'Page Three' culture should not be in Mumbai! | ‘पेज थ्री’ संस्कृती मुंबईत नको!

‘पेज थ्री’ संस्कृती मुंबईत नको!

मुंबई : मुंबईत पेज थ्री कल्चर रुजविण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ मात्र ही मुंबईची संस्कृती नव्हे़ त्यामुळे आपली संस्कृती जपण्यासाठी मुंबईत पेज थ्री कल्चरला थारा देऊ नये, असे टोला भाजपाने स्थायी समितीच्या बैठकीत हाणला़ मात्र वांद्रे विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने शिवसेनेने सबुरीचा मार्ग स्वीकारत यावर मौन बाळगले आहे़
शिवसेना युवाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा मुंबईत नाइटलाइफ सुरू करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे़ तसेच इमारतींच्या गच्चीवर रेस्टॉरेंट सुरू करण्याच्या प्रस्तावालाही शिवसेनेचा पाठिंबा आहे़ मात्र मित्रपक्ष भाजपानेच याविरोधात बंड पुकारत शिवसेनेच्या युवराजांच्या स्वप्नाला सुरुंग लावला आहे़ यावर उघड विरोध करीत भाजपाने शिवसेनेची गोची केली आहे़
भायखळा येथील डॉ़ भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयात आयोजित फॅशन शो मनसेने उधळून लावल्याचे पडसाद आज स्थायी समितीमध्ये उमटले़ असे फॅशन शो पालिकेच्या मालमत्तेमध्ये होतातच कसे, असा सवाल सदस्यांनी केला़ या वेळी बोलताना भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी संधी साधत पेज थ्री ही आपली संस्कृती नव्हे़ त्यामुळे याला थारा नकोच, अशी आपली भूमिका स्पष्ट केली़ (प्रतिनिधी)

च्मरिन ड्राइव्हवर भाजपाने परस्पर एलईडी दिवे बसविले आहेत़ या दिव्यांनी क्वीन्स नेकलेसची शोभा घालवली, असा टोला शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला होता़ यामुळे ठाकरे आणि भाजपाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अ‍ॅड़ आशिष शेलार यांच्यात टिष्ट्वटर वॉर रंगले़

श्रेय लाटण्यास चढाओढ
मालमत्ता करातील वाढीव २० टक्के स्थायी समितीमध्ये रद्द करण्यात आल्याचे श्रेय भाजपाने घेतले़ तर शिवसेनेनेही ५०० चौफ़ुटांखालील घरांना नवीन करप्रणालीतून पाच वर्षांकरिता वगळण्याचा प्रस्ताव मांडून भाजपाला शह दिला

गच्चीवरील रेस्टॉरंटचा प्रस्ताव फेटाळला
च्इमारतींच्या गच्चीवर टेरेस रेस्टॉरंट सुरू करण्याची परवानगी देण्याकरिता पालिकेने धोरण तयार केले आहे़ आदित्य ठाकरे यांच्या नाइटलाइफ प्रस्तावाला हे धोरण पोषक आहे़ मात्र सुधार समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव भाजपाने विरोधकांच्या मदतीने फेटाळून लावत शिवसेनेला धक्का दिला़

Web Title: 'Page Three' culture should not be in Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.