पान २ किंवा हॅलो...शिवसेनेची नजर आता कोल्हापूरवर

By Admin | Updated: December 22, 2014 23:11 IST2014-12-22T23:11:57+5:302014-12-22T23:11:57+5:30

शिवसेनेची नजर आता कोल्हापूरवर

Page 2 or Hello ... Shivsena's eyes are now at Kolhapur | पान २ किंवा हॅलो...शिवसेनेची नजर आता कोल्हापूरवर

पान २ किंवा हॅलो...शिवसेनेची नजर आता कोल्हापूरवर

वसेनेची नजर आता कोल्हापूरवर
मुंबई: मूळ कोल्हापूर असलेल्या पण सध्या मुंबई-ठाणे-नवी मुंबईत स्थायिक झालेल्या शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकार्‍यांची बैठक २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता दादर नायगावमधील कृष्ण हॉल, सदानंद जाधव मार्ग, दादर (पू) येथे होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत प्रथमच कोल्हापूरने सहा आमदार निवडून देऊन शिवसेनेला खंबीर साथ दिली आहे. अलीकडेच कोल्हापूरला जाऊन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी श्री महालक्ष्मीचे दर्शन देखील घेतले होते. त्यामुळे शिवसेना आणि कोल्हापूरचे नाते अधिक घ˜ करण्यासाठी शिवसेनेने चंग बांधला आहे. कोल्हापूरमधील नवनिर्वाचित आमदारांचा मुंबईत सत्कार करण्यासाठी शिवसेना सरसावली आहे. त्या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी वरील बैठकीचे आयोजन माजी नगरसेवक सखाराम गवळी, संपर्क प्रमुख दत्तात्रय निकम, सुनील पाटील, वसंत गुडूळकर यांनी केले आहे.

Web Title: Page 2 or Hello ... Shivsena's eyes are now at Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.