पान २ किंवा हॅलो...जुहूमध्ये मेकअप आर्टिस्टचा विनयभंग

By Admin | Updated: April 4, 2015 01:55 IST2015-04-04T01:55:08+5:302015-04-04T01:55:08+5:30

जुहूमध्ये मेकअप आर्टिस्टचा विनयभंग

Page 2 or hello ... Junky makeup artist molestation | पान २ किंवा हॅलो...जुहूमध्ये मेकअप आर्टिस्टचा विनयभंग

पान २ किंवा हॅलो...जुहूमध्ये मेकअप आर्टिस्टचा विनयभंग

हूमध्ये मेकअप आर्टिस्टचा विनयभंग
तीन दारुड्यांना अटक
मुंबई: गुरुवारी रात्री चित्रपट पाहून घरी परतणार्‍या एका मेकअप आर्टिस्ट महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जुहू पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. घटनेतील चौथा आरोपी फरार आहे. हे तिघेही दारूच्या नशेत होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
गुरु वारी रात्री सव्वा अकाराच्या सुमारास ही महिला एकटीच घरी परतत होती. तिला एकटे पाहून चंदन टॉकीज परिसरात असलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी तिला पाहून अश्लील कमेंट करण्यास सुरवात केली. त्याला तिने प्रत्युत्तर दिल्यानंतर या चौघांनी तिला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. इतकेच नव्हे तर तिच्याशी त्यांनी अश्लील चाळे करण्यात सुरवात केली. हे सर्व जवळच असलेल्या एका इमारतीमधील सुरक्षा रक्षकाने पाहिले आणि तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षावर फोन करून माहिती दिली. या महिलेने मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरवात केली. तिचा आवाज ऐकून जवळच असलेल्या स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नेमकी पोलिसांची पेट्रोलिंग करणारी गाडीही याठिकाणी पोहोचली. त्यांनी घटनास्थळाहून मनीष कुमार (२२), श्यामलाल आगरी (२०) आणि रामलाल आगरी (२०) या तिघांना अटक केली असून त्यांच्या चौथ्या साथीदाराचा शोध सुरु आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Page 2 or hello ... Junky makeup artist molestation