पान १....चंद्रभागेच्या तिरी कार्यक्रम नाहीच -हायकोर्ट

By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:22+5:302015-03-06T23:07:22+5:30

(राज्यासाठीही महत्त्वाची बातमी)

Page 1 .... Chandrabhag's third program is not-haired | पान १....चंद्रभागेच्या तिरी कार्यक्रम नाहीच -हायकोर्ट

पान १....चंद्रभागेच्या तिरी कार्यक्रम नाहीच -हायकोर्ट

(र
ाज्यासाठीही महत्त्वाची बातमी)
..................................
चंद्रभागेच्या तिरी कार्यक्रम नाहीच -हायकोर्ट
मुंबई : चंद्रभागेच्या तिरी कोणतेही कार्यक्रम घेण्यास उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा परवानगी नाकारली.
नदीपात्रात बांधकाम करण्यास व इतर कोणताही विधी उरकण्यास न्यायालयाने गेल्यावर्षी निर्बंध आणले. मात्र धार्मिक विधी करणे हा आमचा मूलभूत अधिकार असल्याने चंद्रभागेच्या तिरी कार्यक्रम घेण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज वारकर्‍यांनी न्यायालयात केला होता.
ही मागणी फेटाळताना न्या. अभय ओक व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठाने वारकर्‍यांचे व सरकारचे चांगलेच कान उपटले. धार्मिक विधी करणे वारकर्‍यांचा मूलभूत अधिकार असल्यास प्रदूषण विरहित शहर असणे, हाही नागरिकांचा मूलभूत अधिकारच आहे. तेव्हा नदीपात्र दूषित होणे, हे गैर असल्याने चंद्रभागेच्या तिरी कोणत्याही कार्यक्रमास परवानगी देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
तसेच वेळोवेळी आदेश देऊन सरकार पंढरपुरात पुरेसे शौचालय उभारत नाही. त्यामुळे मानवाला मानवाची विष्ठा उचलावी लागते. सरकारचे हे वर्तन अशोभनीय आहे. त्यामुळे सरकारनेही येथे अधिकाधिक शौचालय उभारावेत, असे आदेशही न्यायालयाने यावेळी दिले.
पंढरपूरमध्ये विष्ठा उचलावी लागणे, हे अमानवीय असून याला निर्बंध घालावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका एका सामाजिक संघटनेने दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीत न्यायालयाने हे आदेश दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Page 1 .... Chandrabhag's third program is not-haired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.