खार येथे भर रस्त्यात पाच लाखांची लूट

By Admin | Updated: January 2, 2015 00:25 IST2015-01-02T00:25:54+5:302015-01-02T00:25:54+5:30

दागिन्यांची डिलेव्हरी करून मिळालेले पैसे मालकाच्या घरी देण्यासाठी जात असलेल्या एक इसमाला भर रस्त्यात लुटल्याची घटना सोमवारी खार येथे घडली.

Over five lakh looters in Khar | खार येथे भर रस्त्यात पाच लाखांची लूट

खार येथे भर रस्त्यात पाच लाखांची लूट

खार : दागिन्यांची डिलेव्हरी करून मिळालेले पैसे मालकाच्या घरी देण्यासाठी जात असलेल्या एक इसमाला भर रस्त्यात लुटल्याची घटना सोमवारी खार येथे घडली. याबाबत खार पोलिसांनी अज्ञात लुटारूंविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. अशाच प्रकारे मोटारसायकलवर येऊन अज्ञात चोरट्यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या पत्नीचीही पर्स पळविली.
भार्इंदर येथे राहणारे श्रवण पुरी हे वाकोला येथे एका सोने व्यापाऱ्याकडे कामाला आहेत. सोमवारी काही दुकानदारांकडे सोन्याच्या दागिन्यांची डिलिव्हरी दिल्यानंतर पाच लाखांची रक्कम घेऊन ते भार्इंदर येथे त्यांच्या दुचाकीवरून जात होते. खार येथील लिंक रोड परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना धक्का दिला. त्यामुळे तोल जाऊन ते रस्त्यालगत खाली पडले. हीच संधी साधत लुटारूंनी पाच लाखांची रक्कम घेऊन पोबारा केला.
पुरी यांनी या दुचाकीचा नंबर टिपून खार पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात लुटारूंविरूद्ध गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला. मात्र त्यानंतर मंगळवारी वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारे तीन घटना घडल्याने यामध्येदेखील याच लुटारूंचा हात असण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांच्या पत्नीचीदेखील अशाच प्रकारे लुटारूंनी पर्स पळवली आहे. याबाबत त्यांनीदेखील वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Over five lakh looters in Khar