बेस्टकडून एसटीला मिळणारी थकीत रक्कम तात्काळ मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:13 IST2021-09-02T04:13:08+5:302021-09-02T04:13:08+5:30

लोकमत न्युज नेटवर्क मुंबई : दोन महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. बेस्टकडे एसटीचे सुमारे ७१ कोटी रुपये ...

The outstanding amount received by ST from BEST should be received immediately | बेस्टकडून एसटीला मिळणारी थकीत रक्कम तात्काळ मिळावी

बेस्टकडून एसटीला मिळणारी थकीत रक्कम तात्काळ मिळावी

लोकमत न्युज नेटवर्क

मुंबई : दोन महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. बेस्टकडे एसटीचे सुमारे ७१ कोटी रुपये थकले असून, बेस्टने ते एसटीला वर्ग करावेत, अशी मागणी एसटी कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी केली आहे.

कोरोना काळात बेस्टच्या मदतीला धावलेल्या लालपरीचे १९९ पैकी ७१ कोटींचे येणे बाकी आहे. मात्र राज्य शासनाच्या मदत व पुर्नवसन खात्याकडून ती रक्कम आल्यानंतर आम्ही देऊ, असे बेस्ट अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे एसटीच्या अधिकाऱ्यांनी मेपासून पाठपुरावा करूनही हे ७१ कोटी मिळाले नाही. त्यामुळे यासाठी आता मुंबई काँग्रेस अध्यक्ष व महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. बेस्टकडून एसटी महामंडळाला येणे असलेले ७१ कोटी रुपये तात्काळ मिळण्यासाठी मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते व बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांना याप्रकरणी पाठपुरावा करावा, असे बुधावरी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी पत्र देऊन सांगण्यात आले. या वेळी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे उपस्थित होते.

010921\1811-img-20210901-wa0008.jpg

भाई जगताप

Web Title: The outstanding amount received by ST from BEST should be received immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.