काकडे रिंगणातून बाहेर
By Admin | Updated: September 30, 2014 01:34 IST2014-09-30T01:34:31+5:302014-09-30T01:34:31+5:30
नियोजित वेळेत प्रतिज्ञापत्र सादर करु न शकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांचा कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून भरलेला उमेदवारी अर्ज सोमवारी बाद करण्यात आला.

काकडे रिंगणातून बाहेर
>पुणो : नियोजित वेळेत प्रतिज्ञापत्र सादर करु न शकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांचा कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून भरलेला उमेदवारी अर्ज सोमवारी बाद करण्यात आला. आता दीपक मानकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असतील.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून कसबा मतदारसंघासाठी ऐनवेळी दीपक मानकर व अंकुश काकडे या दोघांनाही एबी फॉर्म दिले. मानकर यांनी एबी फॉर्म व प्रतिज्ञापत्रसह निवडणूक अर्ज दाखल केला. मात्र काकडे यांना अर्जासोबत प्रतिज्ञापत्र जोडता आले नाही. वीजपुरवठा खंडित झाल्याने तसेच वाहतुकीच्या खोळंब्यामुळे वेळेत प्रतिज्ञापत्र सादर करता आले नाही, असे काकडे यांचे म्हणणो होते.
राष्ट्रवादीचे दोघांना एबी फॉर्म
पुणो कॅन्टोंमेंटमधून हिना मोमीन व भगवानराव वैराट या दोघांनाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एबी फॉर्म दिला होता. वैराट यांना एक दिवस अगोदर फॉर्म दिल्याने त्यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी 2 वाजून 42 मिनिटांनी अर्ज भरला, तर मोमीन यांना शेवटच्या दिवशी काही तास आधी एबी फॉर्म दिल्याने त्यांनी अर्ज भरण्यासाठी शेवटचा मिनिट असताना म्हणजे 2.59 वाजता अर्ज सादर केला. वैराट यांचा अर्ज अगोदर आल्याने त्यांचा पात्र ठरविला. तर मोमीन यांचा अपात्र ठरविण्यात आला. (प्रतिनिधी)
छाननीमध्ये भाजपाचे विजय मारटकर यांचाही अर्ज बाद करण्यात आला. त्यांनी उमेदवारी अर्जामध्ये भाजपाकडून निवडणूक लढविणार असल्याचे म्हटले होते. मात्र अर्जासोबत एबी फॉर्म नसल्याने निवडणूक अधिका:यांनी त्यांचाही अर्ज बाद ठरविण्यात आला.