एसटीतील ३,३२१ पैकी २,७४० कर्मचारी कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:05 IST2020-12-02T04:05:04+5:302020-12-02T04:05:04+5:30

आतापर्यंत ३ हजार ३२१ बाधित : ९२ जणांनी गमावला जीव लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात एसटी महामंडळाच्या ३६ ...

Out of 3,321 ST employees, 2,740 are corona free | एसटीतील ३,३२१ पैकी २,७४० कर्मचारी कोरोनामुक्त

एसटीतील ३,३२१ पैकी २,७४० कर्मचारी कोरोनामुक्त

आतापर्यंत ३ हजार ३२१ बाधित : ९२ जणांनी गमावला जीव

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात एसटी महामंडळाच्या ३६ विभागांत २५ नोव्हेंबरपर्यंत एकूण ३ हजार ३२१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. यापैकी २,७४० कर्मचारी पूर्णपणे बरे होऊन कामावर परतले आहेत. ४८९ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू असून ९२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

ठाणे विभागात करोनाने मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या विभागातील २५० कर्मचाऱ्यांना काेरोनाची लागण झाली होती. यापैकी १७५ कर्मचारी पूर्णपणे बरे झाले तर ११ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. महामंडळातील सर्वाधिक काेरोनाबाधित कर्मचारी सांगली आणि सोलापूर विभागात आहेत. सांगली आणि सोलापूर विभागात अनुक्रमे ३८६ आणि ३०२ काेरोनाबाधित आहेत.

...........................

Web Title: Out of 3,321 ST employees, 2,740 are corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.