...अन्यथा राज्यातील शाळा बंद ठेवणार

By Admin | Updated: August 11, 2014 22:41 IST2014-08-11T22:19:23+5:302014-08-11T22:41:46+5:30

के. बी. पोवार : १६ पासून माध्यमिक शाळा बंद इशारा

... otherwise the schools in the state will be closed | ...अन्यथा राज्यातील शाळा बंद ठेवणार

...अन्यथा राज्यातील शाळा बंद ठेवणार

गडहिंग्लज : राज्यातील माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या बाबतीत शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर समन्वय समितीतर्फे १६ आॅगस्टपासून राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन सुरू करणार आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष के. बी. पोवार यांनी केले.
गडहिंग्लज येथील वि. दि. शिंदे हायस्कूलमध्ये घेण्यात आलेल्या गडहिंग्लज तालुका मुख्याध्यापक संघ आणि शिक्षकेत्तर संघटनांच्या संयुक्त मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बचाराम काटे होते.
पोवार म्हणाले, आर.टी.ई. कायदा, नवीन संच मान्यता, शिक्षक पदांच्या मंजुरीतील त्रुटी, अर्धवेळ गं्रथपाल पदांना सुरक्षितता, अतिरिक्त शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन, शाळावेतन अनुदान आदींबाबत जाचक अटी शासनाने लादल्या आहेत या विरोधात आवाज उठवण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येवून १६ आॅगस्टपासून शाळां बंदचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनात गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्था प्रतिनिधींनी सहभागी होण्याचे आवाहन पोवार यांनी केले आहे.
यावेळी बचाराम काटे, शिक्षकेत्तर संघटनेचे तालुकाध्यक्ष विश्वास
रेडेकर, शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खोराटे, गं्रथपाल संघटनेचे विभागीय सदस्य संजय थोरात, सागर नांदवडेकर यांनी मार्गदर्शन केले. बजरंग गरूड यांनी आभार मानले.
मेळाव्यास एस. पी. थरकार, जे. डी. पाटील, अनिल हलकर्णी,
एम. एस. बोजगर, बी. बी. कांबळे, जे. डी. वडर आदी उपस्थित
होते. (वार्ताहर)

Web Title: ... otherwise the schools in the state will be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.