... अन्यथा मुंबईला पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2015 01:53 IST2015-11-28T01:53:48+5:302015-11-28T01:53:48+5:30
वातावरणीय बदलामुळे चेन्नईला अवकाळी पावसाने झोडपून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण केली. पाणथळ जमीन आणि खारफुटींना जपले नाही,

... अन्यथा मुंबईला पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागेल
मुंबई : वातावरणीय बदलामुळे चेन्नईला अवकाळी पावसाने झोडपून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण केली. पाणथळ जमीन आणि खारफुटींना जपले नाही, तर मुंबईतही अशीच परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आतापर्यंत बेकायदेशीरपणे पाणथळ जमीन आणि खारफुटी नष्ट करणाऱ्यांवर काय कारवाई करण्यात आली, याची माहिती देण्याचा आदेश दिला.
मुंबईसह राज्यात बेकायदेशीरपणे पाणथळ जमिनी व खारफुटींवर भराव टाकून नष्ट करण्यात येत असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. खारफुटी आणि पाणथळ जमिनी नष्ट करण्यात विकासकांचा मोठा हात आहे. त्यामुळे विकासकांवर कारवाई करण्याचा आदेश राज्य सरकारला द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका ‘वनशक्ती’ या एनजओने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते - ढेरे यांच्या खंडपीठापुढे होती.
बेकायदेशीरपणे पाणथळ जमीन आणि खारफुटी नष्ट करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे दोनदा आदेश देऊनही राज्य सरकारने कारवाई केली नाही, अशी माहिती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी खंडपीठाला दिली.