ऑस्कर अकादमीचे लवकरच मुंबईत कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 04:08 AM2019-05-26T04:08:41+5:302019-05-26T04:08:53+5:30

अ‍ॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्स (ऑस्कर अ‍ॅवॉर्ड्स)ची ख्याती जगभरात असून, ऑस्कर अ‍ॅकॅडमीचे कार्यालय मुंबईत स्थापन करण्याबाबत सकारात्मक असल्याचे अध्यक्ष जॉन बेली यांनी सांगितले.

Oscars Academy's Office in Mumbai soon | ऑस्कर अकादमीचे लवकरच मुंबईत कार्यालय

ऑस्कर अकादमीचे लवकरच मुंबईत कार्यालय

googlenewsNext

मुंबई : अ‍ॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्स (ऑस्कर अ‍ॅवॉर्ड्स)ची ख्याती जगभरात असून, ऑस्कर अ‍ॅकॅडमीचे कार्यालय मुंबईत स्थापन करण्याबाबत सकारात्मक असल्याचे अध्यक्ष जॉन बेली यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेस आॅस्कर अ‍ॅवॉर्ड्सचे अध्यक्ष जॉन बेली, त्यांच्या पत्नी आणि आॅस्कर अ‍ॅकॅडमीच्या गव्हर्नर कॅरल लिटलटन, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उज्ज्वल निरगुडकर उपस्थित होते.
बेली यांनी या वेळी सांगितले की, आॅस्कर अ‍ॅकॅडमीचे सध्या लंडन आणि युरोप येथे कार्यालय आहे. मात्र मुंबईत कार्यालय सुरू केल्यास आशियातले एक केंद्र म्हणून त्याकडे पाहता येईल. त्यामुळे भारतातून परतल्यानंतर आॅस्कर अ‍ॅकॅडमीच्या बैठकीत याबाबत आपण प्रस्ताव ठेवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वर्षभरात भारतात १८०० सिनेमांची निर्मिती होते, ही संख्या हॉलिवूड सिनेमाच्या चार पटीने अधिक आहे. सध्या अ‍ॅकॅडमीत वेगवेगळ्या ५६ देशांतील ९२८ सदस्य आहेत. भविष्यात आॅस्कर अ‍ॅकॅडमीवर भारतीय सिनेमा क्षेत्रातील दिग्गजांनी सहभागी व्हावे, जेणेकरून भारतीय सिनेमा जगभर पोहोचण्यास मदत होईल, अशी अपेक्षा बेली यांनी या वेळी व्यक्त केली.
।आॅस्कर अ‍ॅकॅडमीत दादासाहेब फाळके यांचा पुतळा
पत्रकार परिषदेपूर्वी जॉन बेली आणि कॅरॉल लिटलटन यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची सेवासदन येथे भेट घेतली. या वेळी तावडे यांनी आॅस्कर अ‍ॅकॅडमीच्या म्युझियममध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा कांस्य पुतळा उभारावा, अशी मागणी केली.

Web Title: Oscars Academy's Office in Mumbai soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Oscarऑस्कर