नवी मुंबईत ‘प्रवास २०१७’चे आयोजन
By Admin | Updated: May 17, 2017 03:47 IST2017-05-17T03:47:49+5:302017-05-17T03:47:49+5:30
नवी मुंबईतील वाशी येथे २८ ते ३० जुलै २०१७ या कालावधीत बस, तसेच कार प्रवाशांसाठी ‘सुरक्षा, विश्वासार्हता आणि आधुनिक सेवा’ या संकल्पनेवर आधारित उपक्रम राबविण्यात येणार आहे.

नवी मुंबईत ‘प्रवास २०१७’चे आयोजन
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नवी मुंबईतील वाशी येथे २८ ते ३० जुलै २०१७ या कालावधीत बस, तसेच कार प्रवाशांसाठी ‘सुरक्षा, विश्वासार्हता आणि आधुनिक सेवा’ या संकल्पनेवर आधारित उपक्रम राबविण्यात येणार आहे.
जवळपास ३ हजार बस आॅपरेटर्स, १० हजार व्यावसायिक व्हिजिटर्स आणि १००हून अधिक प्रदर्शक सहभागी होतील, अशी अपेक्षा या उपक्रमाचे आयोजक बस आॅपरेटर्स कॉन्फडरेशन आॅफ इंडिया (बीओसीआय) व एमएम अॅक्टिव्ह साय-टेक कम्युनिकेशन यांनी व्यक्त केली आहे. सर्वोत्कृष्ट सार्वजनिक-खासगी भागीदारी मॉडेल तयार करण्यासाठी, तसेच सखोल एकत्रीकरणासाठी प्रथमच सार्वजनिक व खासगी बस आॅपरेटर्स एकत्र येणार आहेत.