लोकमत सखी मंचच्या वतीने सहलीचे आयोजन
By Admin | Updated: June 15, 2016 01:49 IST2016-06-15T01:49:48+5:302016-06-15T01:49:48+5:30
लोकमत सखी मंचतर्फे महिलांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जात असून महिलांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळखले जाते. पावसाची चाहूल लागली असून त्याचा मनसोक्त

लोकमत सखी मंचच्या वतीने सहलीचे आयोजन
नवी मुंबई : लोकमत सखी मंचतर्फे महिलांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जात असून महिलांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळखले जाते. पावसाची चाहूल लागली असून त्याचा मनसोक्त आनंद घण्यासाठी एकदिवसीय धमाल सहलीचे आयोजन आहे. कर्नाळा येथील पॅनोरॉमिक रिसॉर्ट या निसर्गरम्य ठिकाणी रविवार २६ जून रोजी सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या सहलीचे वैशिष्ट्य म्हणजे लोकमत सखी मंच परिवारातील सदस्यांबरोबर लोकमतच्या महिला वाचकांनाही यामध्ये सहभागी होता येणार आहे. एरव्ही चूल आणि मूल सांभाळणाऱ्या महिलावर्गालाही आनंद लुटण्याची संधी मिळावी याकरिता या एकदिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा लोकमत सखी मंच व्यासपीठाला सर्वच विभागातून भरघोस प्रतिसाद मिळाला असून, या महिला सभासदांकरिता येत्या वर्षात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. महिला सखींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन सहलीचा आनंद लुटावा, असे आवाहन लोकमत सखी मंचतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
सहलीसाठी शुल्क
850 रुपये.
लोकमत सखी मंच सदस्यांसाठी
1000 रुपये
लोकमत महिला वाचकांसाठी
800 रुपये
लहान मुले आणि मुलींसाठी
नावनोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा - ९१६७७९०४७०
नावनोंदणीची अंतिम तारीख :
२२ जून २०१६