Join us

'आणीबाणी’च्या निषेधार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन

By मनोहर कुंभेजकर | Updated: June 24, 2023 15:36 IST

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत ‘रंगशारदा येथे होणार कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई- दि,२५ जून १९७५ या दिवशी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. स्वातंत्र्यानंतरचा भारतातील काळा इतिहास म्हणून नोंदल्या जाणाऱ्या आणीबाणीतील अत्याचार आणि दडपशाहीच्या कहाण्या समाज आणि तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी मुंबई भाजपाच्या वतीने केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत ‘उद्या आणीबाणी’च्या निषेधार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 सदर कार्यक्रम उद्या रविवार दि,ता.२५ रोजी सायंकाळी ५ वा. वांद्रे (प.) येथील रंगशारदा सभागृहात होईल अशी माहिती भाजपा महामंत्री संजय उपाध्याय यांनी दिली. मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.तर कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेचे गटनेते,आमदार प्रवीण दरेकर, आमदार अतुल भातखळकर, आमदार सुनील राणे, आमदार अमित साटम, आमदार योगेश सागर उपस्थित राहणार आहेत. 

मानवाधिकारांचे व माध्यम स्वातंत्र्याचे हनन करणाऱ्या या काळात झालेल्या अत्याचारांची कहाणी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मुंबई भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती भाजपा महामंत्री संजय उपाध्याय यांनी दिली.

टॅग्स :भाजपा