१ मे रोजी वर्सोव्यात शोभायात्रा व बाईक रॅलीचे आयोजन; शोभा यात्रेत ५००० नागरिक सहभागी होणार
By मनोहर कुंभेजकर | Updated: April 29, 2023 18:38 IST2023-04-29T18:38:09+5:302023-04-29T18:38:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई-मॉडेल टाउन रेसिडेंन्टस वेल्फेअर असोसिएशन व स्वप्नाक्षय मित्र मंडळ,वर्सोवा मेट्रो स्टेशन जवळ,सातबंगला यांच्यातर्फे दर वर्षाप्रमाणे यावर्षीही दि, ...

१ मे रोजी वर्सोव्यात शोभायात्रा व बाईक रॅलीचे आयोजन; शोभा यात्रेत ५००० नागरिक सहभागी होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई-मॉडेल टाउन रेसिडेंन्टस वेल्फेअर असोसिएशन व स्वप्नाक्षय मित्र मंडळ,वर्सोवा मेट्रो स्टेशन जवळ,सातबंगला यांच्यातर्फे दर वर्षाप्रमाणे यावर्षीही दि, १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शोभायात्रा व बाईक रैंली काढण्यात येणार आहे. सदर शोभायात्रा सकाळी ९ वाजता सुरु होणार असून तिचा मार्ग. चाचा नेहरू उद्यान, मॉडेल टाउन, सातबंगला येथून जे.पी. रोड, चार बंगला, बॉन-बॉन लेन, महाराष्ट्र लेन, सात बंगला, जे.पी. रोड, यारी रोड वर्सोवा. ओल्ड फिशरिज रोड, सात बंगला ते पुन्हा मॉडेल टाउन येथे संपणार आहे.
या शोभायात्रेत प्रमुख पाहुणे म्हणून विभागप्रमुख,आमदार अॅड.अनिल परब, राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी, आमदार,माजी महापौर सुनील प्रभू, आमदार सुनील शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या शोभायात्रेत महाराष्ट्राच्या पारंपारिक व सांस्कृतिक कलेचे दर्शन घडविणारे, चित्ररथ, आदिवासी नृत्य महिला लेझीम, ५१ ढोल पथक, दांडपट्टा, वारकरी भजन, दिंडी मंगळा गौर सहभागी होणार आहेत.तर महाराष्ट्राची परंपरा दर्शविणा-या वेषभूषा धारकांना पारितोषिक ठेवण्यात आली आहेत. ५०० बाईकस्वार असणार आहेत. या शोभा यात्रे मध्ये ५००० नागरिक सहभागी होणार आहेत.या कार्यक्रमाचे आयोजन पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र (बाळा) आंबेरकर, राजेश ढेरे, अनिल राऊत, अशोक मोरे, संजिव कल्ले (बिल्लू), प्रशांत काशीद यांनी केले आहे.
या भव्य शोभायात्रे मध्ये सुरुवातीला मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगार व जेष्ठ नागरिक व गरजूंना चादर वाटप करण्यात येणार आहे. तसेच गरजू महिलांना साडी वाटप व अपंगांना सायकल वाटप करण्यात येणार असल्याची माहिती बाळा आंबेरकर यांनी दिली.