दुखापती टाळण्यासाठी आयोजक सरसावले
By Admin | Updated: August 19, 2014 00:06 IST2014-08-19T00:06:19+5:302014-08-19T00:06:19+5:30
शेकडो गोविंदा पथकांनी आज ‘बोल बजरंग बली की जय’च्या घोषात मानाच्या दहीहंडय़ा फ ोडून गोपाळकाल्याचा उत्सव साजरा केला.

दुखापती टाळण्यासाठी आयोजक सरसावले
‘गोविंदा आला रे ..आला’ अशी हाळी देत अन् ‘मच गया शोर सारी नगरी रे..’ चे गाणो गात शेकडो गोविंदा पथकांनी आज ‘बोल बजरंग बली की जय’च्या घोषात मानाच्या दहीहंडय़ा फ ोडून गोपाळकाल्याचा उत्सव साजरा केला. सकाळपासून गोविंदा पथकांची रेलचेल सुरू झाली होती. नवी मुंबईतील लाखमोलांच्या बक्षिसांची लयलूट करण्यासाठी सालाबादप्रमाणो मुंबई आणि ठाण्यातील गोपी आणि गोपिकांची पथके शहरात अवतरली होती. ढोल-ताशे, डीजे व कोळी गीते व लावणीच्या तालावर गोविंदांनी एकच जल्लोष केला.
नवी मुंबई : बालगोविंदांना होणा:या दुखापती टाळण्यासाठी यंदा प्रथमच आयोजकांनी पुढाकार घेतल्याचे पहायला मिळाले. काही दहीहंडी आयोजकांनी आपल्या हंडय़ाच रद्द केल्या, तर काहींनी पथकांमधली स्पर्धा संपवून साध्या पध्दतीने उत्सव साजरा केला. तरीही ठिकठिकाणच्या पथकांच्या हजेरीमुळे शहरात उत्सवाची धूम मात्र कायमच होती.
बालगोविंदांचे मृत्यू अथवा जखमी होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. हे प्रकार गांभीर्याने घेऊन यंदा शहरातील अनेक आयोजकांनी पथकांमधील थरांची स्पर्धा बंद केली होती. कोपरखैरणो येथील वन वैभव कला क्रीडा निकेतनतर्फे देखील दहीहंडी उत्सवाला आवर घातला. प्रतिवर्षी या ठिकाणी पाच हंडय़ा उभारुन लाखो रुपयांच्या पारितोषिकांचे वितरण केले जायचे. त्यामुळे या हंडय़ा फोडण्यासाठी पथकांची मोठय़ा प्रमाणात स्पर्था लागायची. परंतु यंदा त्या ठिकाणी हंडी फोडण्यासाठी पथकांमध्ये लागणारी चुरस पहायला मिळाली नाही. पथकांच्या आग्रहाखातर तेथे एकच मानाची हंडी उभारण्यात आली. त्यानुसार ही हंडी फोडण्यासाठी येणा:या प्रत्येक पथकाला सलामीचे 1,111 रुपये पारितोषिक देण्यात आले. पथकांमधील स्पर्धेला आवर घालत गोविंदा जखमी होण्याचे प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे वन वैभवचे अध्यक्ष वैभव नाईक यांनी सांगितले. त्याचप्रमाणो सानपाडा येथील नाखवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळाने हंडी रद्द करून आदिवासी विद्याथ्र्याना आर्थिक मदत केली. दहीहंडीच्या दिवशी मंडळाच्या पदाधिका:यांनी जव्हार, मोखाडा येथे जावून तेथील आदिवासी विद्याथ्र्यासाठी 5क् हजार रुपयांचा मदतनिधी दिला. तसेच तेथील 1क् विद्याथ्र्याना देखील दत्तक घेण्यात आल्याचे मंडळाचे अध्यक्ष निशांत भगत यांनी सांगितले. यावेळी मृत बालगोविंदा किरण तळेकरी याला श्रध्दांजली देखील वाहण्यात आली. हंडीच्या माध्यमातून पुरस्कार स्वरुपात खर्च होणारी रक्कम लोकोपयोगी लावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवल्याचे भगत यांनी सांगितले. त्याशिवाय अनेक आयोजकांनी आपल्या हंडय़ा रद्द केल्याने दहीहंडीच्या दिवशीही काही ठिकाणच्या चौकांनी मोकळा श्वास घेतला. तर दहीहंडी आयोजकांनी उत्सवाला आवर घातला असतानाही नवी मुंबईबाहेरील गोविंदा पथकांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावल्याचे पहायला मिळाले. (प्रतिनिधी)
सानपाडा येथील मयत बालगोविंदाच्या कुटुंबीयांना मदत
नवी मुंबई : वन वैभव कला क्रीडा निकेतनच्या वतीने सानपाडा येथे सरावादरम्यान मृत पावलेल्या बालगोविंदाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष युवा सेनेचे जिल्हा प्रमुख वैभव नाईक यांनी सदर मुलाच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांचा धनादेश दिला.
दहा दिवसांपूर्वी सानपाडा येथे दहीहंडीचा सराव करताना जखमी झालेल्या किरण तळेकरी या बालगोविंदाचा मृत्यू झाला होता. बारा वर्षाचा किरण हा आपल्या बालमित्रंसोबत दहीहंडीचे थर रचण्याचा सराव करत होता. यावेळी थरावरुन पडून तो जखमी झाला असतानाही आर्थिक परिस्थितीअभावी त्याला वेळीच उपचार मिळू शकले नाहीत. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. यापाश्र्वभूमीवर शहरातील अनेक मंडळांनी किरणच्या कुटुंबाला आर्थिक मदत देऊ केली. त्याशिवाय ऐरोली येथील करण मित्र मंडळातर्फे देखील किरण याच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देण्यात आला. यंदाची दहीहंडी रद्द करुन पथकांना दिली जाणारी पुरस्काराची रक्कम तळेकरी कुटुंबाला देण्यात आली. त्यानुसार 25 हजार रुपयांची रक्कम मंडळाचे प्रमुख तथा नगरसेवक मनोहर मढवी व नगरसेविका विनया मढवी यांनी मृत किरणच्या कुटुंबीयांना दिली. तसेच दोन महिन्यांपूर्वी घणसोली येथे रेल्वेत हत्या झालेल्या तुषार जाधव या विद्याथ्र्याच्या घरच्यांनाही आर्थिक मदतीचा हात देण्यात आला. (प्रतिनिधी)
6500 गोविंदांचा विमा
कोपरखैरणो येथील राष्ट्रवादी पुरस्कृत सन्मान प्रतिष्ठानच्या वतीने 58 पथकांतील 6500 गोविंदांचा विमा उतरविण्यात आला आहे. तसेच दहीहंडी फोडताना खाली पडून गोविंदा जखमी होवू नयेत यासाठी खाली मॅट अंथरण्यात आली. शहरातील अशाप्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. त्यामुळे मुंबई, ठाणो व रायगडमधून आलेल्या गोविंदा पथकांनी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.