प्रकाशनावर आयोजक ठाम

By Admin | Updated: October 12, 2015 05:12 IST2015-10-12T05:12:04+5:302015-10-12T05:12:04+5:30

गझलगायक गुलाम अली यांच्या पाठोपाठ पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या

The organizer is firm on the publication | प्रकाशनावर आयोजक ठाम

प्रकाशनावर आयोजक ठाम

मुंबई : गझलगायक गुलाम अली यांच्या पाठोपाठ पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या मुंबईतील पुस्तक प्रकाशनाच्या विरोधात शिवसेना ठाम असल्याने हा कार्यक्रम वाढीव पोलीस बंदोबस्तात सोमवारी होणार आहे. आयोजकांनी रविवारी रात्री शिवसेनेचे मन वळविण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही.
नेहरू तारांगणमध्ये सोमवारी सायंकाळी खुर्शीद कसुरी यांच्या ‘नायदर द हॉक नॉर द डव्ह’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार असून तो झाल्यास ‘सेना स्टाईल’ आंदोलन करून उधळून लावण्यात येईल, असा धमकीवजा इशारा शिवसेनेने दिला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी वरळी येथील नेहरु तारांगणच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. आॅब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होणार आहे. या संस्थेचे अध्यक्ष सुधींद्र कुळकर्णी यांनी रविवारी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेऊन या कार्यक्रमाला शिवसेनेने केलेला विरोध मागे घेण्याची विनंती केली. त्यावर उद्धव ठाकरे यांनी, हा कार्यक्रम करण्यावर तुम्ही ठाम असाल तर, त्याला केलेल्या विरोधावर आम्ही देखील ठाम आहोत, असे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The organizer is firm on the publication