आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांसाठी 'वर्षा सहलीचे' आयोजन
By मनोहर कुंभेजकर | Updated: July 17, 2023 16:26 IST2023-07-17T16:26:23+5:302023-07-17T16:26:37+5:30
या सहलीला पक्षाचे उपनेते अमोल कीर्तिकर यांनी देखील हजेरी लावल्याने शिवसैनिकांचा आनंद द्विगुणित झाला.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांसाठी 'वर्षा सहलीचे' आयोजन
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वर्सोवा विधानसभेतील शाखा क्र ५९-६० चे उपविभागप्रमुख राजेश शेट्ये यांनी आगामी निवडणुकीचा हंगाम पाहाता प्रभागातील १२५ शिवसैनिक व पदाधिकारी यांची वर्षा सहल मुंबईजवळील नालासोपारा येथील 'ग्रीन व्हॅली रिसोर्ट' येथे आयोजित केली होती.
नैसर्गिकरित्या डोंगराच्या पायथ्याशी साकार केलेल्या ग्रीन व्हॅली रिसोर्टच्यामध्ये जलतरण तलाव, कृत्रिम धबधबा, रेन डान्स, आणि इतर अँडव्हेंचर अशा वैविध्यपूर्ण रिसोर्टमध्ये सुमारे १२५ महिला व पुरूष शिवसैनिकांनी वर्षा सहलीचा मनसोक्त आनंद लुटला.
या सहलीला पक्षाचे उपनेते अमोल कीर्तिकर यांनी देखील हजेरी लावल्याने शिवसैनिकांचा आनंद द्विगुणित झाला. अशा सहलीमधून एकोप्याने पक्षाचे काम करावे, हा संदेश कार्यकर्त्यांमध्ये पोहोचतो, म्हणून खास करून वर्षा सहल आयोजित करण्यात याव्यात अशी भावना समस्त शिवसैनिक पदाधिकारी यांनी व्यक्त केली.