रोगमुक्तीसाठी सेंद्रिय शेतीची गरज

By Admin | Updated: August 11, 2014 22:41 IST2014-08-11T22:22:13+5:302014-08-11T22:41:28+5:30

एस. नारायण रेड्डी : सिद्धगिरी मठाच्यावतीने आयोजित सिद्धगिरी सेंद्रिय शेती कार्यशाळा

Organic Farming Need for Disease Recovery | रोगमुक्तीसाठी सेंद्रिय शेतीची गरज

रोगमुक्तीसाठी सेंद्रिय शेतीची गरज

कणेरी : कॅन्सर, ह्दयरोग, मधुमेह यांसह अनेक रोग झपाट्याने वाढत आहेत. हा सर्व रासायनिक शेतीचा परिणाम आहे. त्यामुळे यापुढे सेंद्रिय शेतीची उत्पादने खाल्ली तर आपण रोगमुक्त होऊ, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सेंद्रिय शेतीतज्ज्ञ डॉ. एस. नारायण रेड्डी यांनी केले. यावेळी विविध राज्यांतून सेंद्रिय शेतीचे जवळपास तीनशे प्रतिनिधी उपस्थित होते.
कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठाच्यावतीने आयोजित सिद्धगिरी सेंद्रिय शेती कार्यशाळेत डॉ. एस. नारायण रेड्डी यांनी एकापेक्षा एक सेंद्रिय शेतीचे फॉर्म्युले सांगून उपस्थित शेतकऱ्यांना थक्क केले. मठाधिपती प. पू. श्री. काडसिद्धेशवर स्वामीजींच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचा प्रारंभ झाला.
दोन दिवस झालेल्या या कार्यशाळेत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती विषयीच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली.
यावेळी डॉ. शेट्टी म्हणाले की, रासायनिक शेतीमुळे सध्या मानवी जीवनात तसेच शेतीत रोगांची वाढ झपाट्याने होऊ लागली आहे. त्यामुळे कॅन्सरचे प्रमाणही झपाट्याने वाढू लागले आहे.
याचा परिणाम संपूर्ण भारत देशावर होत आहे. पूर्वी भारत सेंद्रिय शेतीत परिपूर्ण होता. मात्र, हरितक्रांतीच्या वादळात रासायनिक शेतीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे मानवाच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊन अनेक रोगांना बळी पडावे लागले. मनुष्याचे शरीर सदृढ होण्यासाठी गाईच्या उत्पादनाच्या सेवनाबरोबरच सेंद्रिय शेतीतून पिकविलेले धान्य खाणे गरजेचे आहे. (वार्ताहर)

-रासायनिक शेतीपेक्षा १५० पटीने सेंद्रिय शेती स्वस्त
-मातीचे आरोग्य सुधारते, पीक उत्पादनात वाढ होते
-गाईचे संवर्धन काळाची, आरोग्याची गरज.

जी. एम. बियाणाला विरोधात ठराव
ज्या बी.एम. बियाणाला अख्खा युरोप देशाने आंदोलन करुन विराध केला. ते बियाणे भारतात आणून वितरीत केले जाणार आहे. या बियाणांचा मानवी आरोग्यास मोठा धोका आहे. त्यामुळे कार्यशाळेला उपस्थित शेतकऱ्यांनी जी. एम. बियाणाला विरोध करण्याचा ठराव एकमुखाने मान्य करण्यात आला.

रासायनिक खते, औषधे फवारणीमुळे जे पिकविले जात आहे. त्यामुळे मनुष्याच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमी होत आहे. ज्यावेळी मनुष्य सशक्त होईल त्यावेळी भारत महासत्ता होईल.
- श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी

Web Title: Organic Farming Need for Disease Recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.