वृद्धाच्या अवयवदानामुळे दाेघांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:24 IST2020-12-13T04:24:21+5:302020-12-13T04:24:21+5:30
मुंबईतील ३०वे अवयव प्रत्यारोपण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुलुंड येथील खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या ६३ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा ...

वृद्धाच्या अवयवदानामुळे दाेघांना जीवदान
मुंबईतील ३०वे अवयव प्रत्यारोपण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुलुंड येथील खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या ६३ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा गुरुवारी मेंदू मृत झाला. घरच्यांनी दिलेल्या संमतीमुळे त्यांचे अवयवदान करण्यात आले. यामुळे दोघांना जीवदान मिळाले.
कोरोना काळात यंदा अवयवदान कमी प्रमाणात झाले. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात झाल्यापासून मुंबईमध्ये अवयवदानाच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मुलुंड येथील फोर्टीस रुग्णालयात गुरुवारी मेंदूमृत ज्येष्ठ नागरिकाच्या कुटुंबाने अवयवदानाचा निर्णय घेतल्याने दोघांना जीवदान मिळाले.
त्यांचे हृदय आणि यकृताचे प्रत्यारोपण करण्यात आले. त्यामुळे दोन जणांना जीवदान मिळाले, असे मुंबई विभागीय अवयवदान आणि प्रत्यारोपण समितीच्या डॉ. एस.के. माथूर यांनी सांगितले. दोन महिन्यांतील हे चौथे अवयवदान तर मुंबईतील ३०वे अवयवदान ठरले.