Join us  

ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांना १२ कोटी रुपयांची थकबाकी देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 7:31 PM

ठाणे जिल्ह्यातील शाळांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकलेली सुमारे १२ कोटी रुपयांच्या रकमेला शिक्षण संचालनालायकडून मंजुरी देण्यात आली

मुंबई- ठाणे जिल्ह्यातील शाळांच्या शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकलेली सुमारे १२ कोटी रुपयांच्या रकमेला शिक्षण संचालनालायकडून मंजुरी देण्यात आली असून थकीत वेतन अदा करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीचे कोकण व मुंबई विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले.याबाबत अनिल बोरनारे यांनी १४ फेब्रुवारी रोजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन निधी मंजूर होऊनही शिक्षण संचालनालयाकडून मंजुरी मिळत नसल्याने थकीत वेतन अदा करण्यात समस्या निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणून दिले, त्यावर शिक्षणमंत्र्यांनी त्वरित शिक्षण संचालकांना तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले. शिक्षण संचालकांनी १५ फेब्रुवारी रोजी मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक, ठाणे जिल्हा वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालय व जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांना आदेश देऊन रक्कम प्रदान करण्यास मंजुरी दिली आहे.मुंबई विभागातील ठाणे जिल्ह्यात सुमारे २५० प्लॅन मधील प्राथमिक शाळा व वर्ग तुकड्या असून १०३५ शिक्षक या शाळांमध्ये कार्यरत आहेत. जानेवारी व फेब्रुवारी २०१७ या दोन महिन्याची नियमित वेतनाची रक्कम ७ कोटी ३० लाख ४६ हजार रुपये, वेतनाच्या टप्प्यातील फरकांची देयके ५ कोटी ३२ लाख १७ हजार तर वरिष्ठ वेतनश्रेणी फरक देयके रक्कम २४ लाख ८२ हजार अशी एकूण १२ कोटी ८७ लाख ४५ हजार रुपयांची रक्कम शिक्षकांना देय आहेथकीत वेतनाबाबत अनिल बोरनारे यांनी ७ जुलै २०१८ रोजी ठाणे वेतन कार्यालयास, ८ ऑक्टोबर २०१८ रोजी शिक्षण संचालक पुणे यांना निवेदन देऊन पाठपुरावा करून उपोषणाचा इशाराही दिला होता. शिक्षण संचालकांनी त्यावर ३० टक्के निधी कमी पडत असल्याचे सांगून उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. ३० टक्के निधी बाबत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे अनिल बोरनारे यांनी पाठपुरावा केला होता.

टॅग्स :शिक्षक