Join us  

मुद्द्यांना बगल देऊन दिशाभूल करण्याचा विरोधकांचा प्रयत्न - पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 5:17 AM

पटोले म्हणाले, मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात सचिन वाझे हे चौकशी अधिकारी नाहीत. या प्रकरणाचा तपास एटीएसकडे आहे, त्याच्याशी वाझेंचा काहीही संबंध नाही

nमुंबई : केंद्र सरकारने केलेली अन्यायकारक इंधन दरवाढ, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, फडणवीस सरकारच्या काळातला महाऑनलाइन घोटाळा, मराठा आरक्षण प्रकरणातील केंद्र सरकारची संदिग्ध भूमिका, प्रभू श्रीरामाच्या नावाने सुरू असलेली लूट अशा मुद्द्यांना बगल देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न असून, त्यासाठीच विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सचिन वाझेंचा मुद्दा उपस्थित करून गोंधळ घातला जात आहे. मनसुख हिरेन प्रकरणात जे दोषी असतील त्यांची चौकशी करून त्यांना शिक्षा करण्यात सरकार मागेपुढे पाहणार नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

पटोले म्हणाले, मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात सचिन वाझे हे चौकशी अधिकारी नाहीत. या प्रकरणाचा तपास एटीएसकडे आहे, त्याच्याशी वाझेंचा काहीही संबंध नाही. असे असतानाही विरोधी पक्ष नेते जाणीवपूर्वक वाझेंचा मुद्दा उपस्थित करीत आहेत.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कॉल डिटेल्स रेकॉर्ड कसे मिळाले? त्यांना ते मिळविण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न उपस्थित करून मुकेश अंबानी यांची सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक आहे. तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था असताना अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके असलेली गाडी कशी काय जाऊ शकते, असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला.

पत्नी विमला यांनी उलगडला घटनाक्रमnडॉ. पीटर न्यूटन यांची स्कॉर्पियो ३ वर्षांपासून पती मनसुख हिरेन वापरत होतेnसचिन वाझे यांनी नोव्हेबर २०२० रोजी स्कॉर्पियो वापरण्यासाठी नेली. त्यानंतर ५ फेब्रुवारीला त्यांच्या चालकामार्फत ती पुन्हा पाठवली. n१७ फेब्रुवारी : सायंकाळी ६.३०च्या सुमारास ठाणे येथून कारमधून ते मुंबईच्या दिशेने निघाले तेव्हा कार मध्येच बंद पडली. ते ओलाने पुढे गेले.n१८ फेब्रुवारी : कार न सापडल्याने त्यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार केली.n२५ फेब्रुवारी : रात्री एटीएसने हिरेन यांना बोलावून कारबाबत चौकशी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांना घरी पाठवले.n२६ फेब्रुवारी : सचिन वाझेंसोबत पती गुन्हे शाखेत चौकशीसाठी गेले. तेथून रात्री १०.३० वाजता वाझेंसाेबतच घरी परतले.n२७ फेब्रुवारी : पुन्हा वाझेंसोबत चौकशीसाठी गेले.n२८ फेब्रुवारी : पुन्हा वाझेंसोबत चौकशीसाठी गेले. त्यांचा जबाब नोंदवून ती कॉपी घरी देण्यात आली.n१ मार्च : भायखळा पोलिसांकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले. मात्र ते गेले नाहीत.n२ मार्च : संध्याकाळी दुकानातून घरी आल्यानंतर वाझेंसोबत मुंबईत गेले. तेथे त्यांच्या सांगण्यावरून वकील गिरी यांच्याशी संवाद साधला. पोलीस आणि माध्यमांकडून त्रास होत असल्याबाबत सांगत आयुक्तांकडे तक्रार केली.n३ मार्च : सचिन वाझेंनी अटक होण्याचा सल्ला दिला.n४ मार्च :  कांदिवली गुन्हे शाखेकडून तावडे नावाच्या व्यक्तीचा कॉल आल्याचे सांगून हिरेन बाहेर गेले. n५ मार्च : हिरेन यांचा मृतदेह आढळला. 

 

टॅग्स :नाना पटोलेसचिन वाझेमनसुख हिरण