भूसंपादनाला विरोध
By Admin | Updated: December 18, 2014 23:56 IST2014-12-18T23:56:49+5:302014-12-18T23:56:49+5:30
रेल्वे डेडीकेटेड कॉरीडोर प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी अनेक प्रकल्पग्रस्तांनी त्याचा इन्कार केला आहे.

भूसंपादनाला विरोध
वसई : रेल्वे डेडीकेटेड कॉरीडोर प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी अनेक प्रकल्पग्रस्तांनी त्याचा इन्कार केला आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून भूसंपादनाची संपूर्ण माहिती संबंधित भूसंपादन अधिकाऱ्यांनी जाहीर करावी अशी मागणी प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी केली आहे.
हा प्रकल्प स्थानिक भूमीपुत्रांना उद्ध्वस्त करणारा असून या प्रकल्पाचा मार्ग हा भूमीपुत्रांच्या घरावरून दाखवल्याने स्थानिकांचा त्याला कडाडून विरोध
आहे. मध्यंतरीच्या काळात
भूसंपादन अधिकाऱ्यांनी जमिनीची मोजणी करण्यास सुरूवात केली होती.
याप्रकरणी गोखिवरे गावातील काही नागरीकांनी न्यायालयात दाद मागितल्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही असा ग्रामस्थांचा दावा आहे. त्यामुळे गावांचे अॅवॉर्ड जाहीर झाले. भूसंपादन अधिकाऱ्यांच्या या दाव्यात तथ्य नसल्याचे गोखिवरे येथील मोहन भोईर यांनी लोकमतला सांगितले. (प्रतिनिधी)