CM Devendra Fadnavis News: मुंबई महापालिकेच्या महापौररितू तावडे पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आल्या आहेत. महापौररितू तावडे यांच्या नव्या कोऱ्या गाडीवर असलेल्या लाल व निळ्या दिव्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावरून विरोधकांनी रितू तावडे यांच्यावर टीका केली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना भूमिका स्पष्ट केली आहे.
नियमांना ब्रेक आणि महापौरांच्या गाडीला झगमगाट, मुंबईत व्हीआयपी संस्कृतीची पुन्हा एन्ट्री? दोन दिवसांपूर्वीच महापौर मॅडम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या जीआरला दिलेल्या सूचनेला हरताळ फासला. आता तर केंद्र सरकार यांनी दिलेला निर्णयाला हरताळ फासला आहे. व्हीआयपी संस्कृती पंतप्रधान मोदी, केंद्र सरकार यांनी संपवली होती. पण, मुंबईच्या महापौरांना व्हीआयपी संस्कृतीचा मोह टाळता आला नाही. पंतप्रधान मोदी केंद्र सरकारचे निर्णय... महापौर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का?, असा सवाल उपस्थित करत किशोरी पेडणेकर यांनी रितू तावडे यांच्यावर हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली भूमिका
मी त्याची माहिती घेतली. लाल दिवा गाडीवर वगैरे नव्हता. पण बोनेटच्या ठिकाणी लाल दिवा होता. त्याच्यामध्ये महापौरांचा काहीच दोष नाही. त्या संदर्भात राज्यामध्ये कोणीही लाल दिवे वापरू नयेत हा जुनाच आपला नियम आहे. त्यामुळे महापौरांना त्याची कल्पना आहे. मला असे वाटते की त्यांना विनाकारण टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे टार्गेट करणे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या नव्या इनोव्हा गाडीवर छतावर दिवे नसले तरी समोरच्या भागात (फ्रंट ग्रिल किंवा बंपरजवळ) लाल आणि निळे फ्लॅशिंग दिवे बसवलेले दिसत आहेत. त्यांच्या ताफ्यातील एक स्कॉर्पिओ गाडीवरही पोलिस वाहनांसारखे लाल-निळे दिवे लावलेले आहेत. यामुळे व्हीआयपी संस्कृती पुन्हा सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे. याबाबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Web Summary : Mayor Ritu Tawade faced criticism for using red and blue lights on her car. CM Fadnavis defended her, stating the light was on the bonnet, not violating rules. Opposition alleges VIP culture; Fadnavis clarifies there's no fault.
Web Summary : महापौर रितु तावड़े अपनी गाड़ी पर लाल और नीली बत्ती के इस्तेमाल को लेकर विवादों में घिरीं। सीएम फडणवीस ने उनका बचाव करते हुए कहा कि बत्ती बोनट पर थी, नियमों का उल्लंघन नहीं। विपक्ष ने वीआईपी संस्कृति का आरोप लगाया; फडणवीस ने कहा कोई दोष नहीं।