शिवकालीन शस्त्रे पाहण्याची संधी

By Admin | Updated: January 29, 2015 01:57 IST2015-01-29T01:57:50+5:302015-01-29T01:57:50+5:30

महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून देणाऱ्या शिवकालीन शस्त्रांची माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ आणि दुर्गावीर प्र

The opportunity to see the Shiva warships | शिवकालीन शस्त्रे पाहण्याची संधी

शिवकालीन शस्त्रे पाहण्याची संधी

नवी मुंबई : महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून देणाऱ्या शिवकालीन शस्त्रांची माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ आणि दुर्गावीर प्रतिष्ठान यांच्या वतीने आज सानपाडा येथे शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरविले आहे.
शिवाजी महाराजांचे कार्य फक्त इतिहासापुरतेच मर्यादित न राहता लोकांपर्यंत शिवाजी महाराजांचे किल्ले, त्यांनी जिंकलेली युध्दे, त्यात वापरलेली शस्त्रे यांचे प्रथमच प्रदर्शन भरविले आहे. लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असलेल्या या प्रदर्शनात २०० हून अधिक शस्त्रे मांडण्यात आली आहेत. यात मराठा, मुघल, राजपूत तलवार, मराठा धोप, पट्टा, समशेर खंडा, पदकुंत, अश्वकंत, गजकुंज आदि प्रकारातील भाले, मराठा कट्यार, मुघल कट्यार, हैद्राबादी कट्यार, चामड्याच्या कातडीपासून तयार केलेल्या ढाली, गुंर्ज,शमशेर, पोलादी भाला, तोफ, तोफेतील गोळे, मूठचे विविध प्रकार, कुकरी, वेगवेगळ्या प्रकारची वाघनखे, अस्वल पंजा आदी शस्त्रे शिवप्रेमींचे लक्ष वेधून घेत होते. या सर्व शस्त्रांचे संघटन नीलेश अरुण सक ट यांनी केले आहे. यावेळी प्रतिष्ठानचे सदस्य आणि पदाधिकारी प्रदर्शन बघायला येणाऱ्यांना प्रत्येक शस्त्राची नावे आणि युध्दातील वापर आदि माहिती सांगत होते.
राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ आणि दुर्गावीर प्रतिष्ठानचे शिवकालीन किल्ले टिकविण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांचे संरक्षण आणि स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत आतापर्यंत सुरगड, मानगड, रायगड आदि किल्ल्यांची साफसफाई करण्यात आली आहे. तसेच येथील पाण्याच्या टाक्याही साफ करण्यात आल्या.
त्याचबरोबर किल्ले बघण्यासाठी येणाऱ्या लोकांना पाण्याची, बसण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती पोस्टरच्या माध्यमातून दिली आहे. यावेळी राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय खिलारे, नूतन खिलारे, ‘दुर्गावीर’चे संतोष हासुरकार, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: The opportunity to see the Shiva warships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.