Join us

मंगळवारी खगोलप्रेमींना मिळणार मंगळ निरीक्षणाची सुवर्णसंधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 14:16 IST

सतरा वर्षांनी 11 सप्टेंबर 2035 रोजी मंगळ  पृथ्वीच्या जवळ 5 कोटी 69 लक्ष किलोमीटर अंतरावर येणार आहे.

मुंबई : मंगळवार 31 जुलै रोजी मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ 5 कोटी 75 लक्ष किलोमीटर अंतरावर येणार असल्यामुळे खगोलप्रेमींना मंगळ निरीक्षणाची सुवर्णसंधी मिळणार असल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. मंगळ जेव्हा पृथ्वीपासून दूर जातो त्यावेळी तो पृथ्वीपासून 40 कोटी 10 लक्ष किलोमीटर अंतरावर जातो. सध्या सर्वांना साध्या डोळ्यांनी रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात उत्तराषाढा नक्षत्रात मंगळ ग्रहाचे सुंदर दर्शन होऊन तो  रात्रभर आकाशात पाहता येईल. तसेच तो लालसर रंगाचा दिसत असल्याने सर्वांना सहज ओळखता येईल असेही त्यांनी सांगितले.

पंधरा वर्षांपूर्वी 27 ऑगस्ट 2003  मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ 5 कोटी 57 लक्ष किलोमीटर अंतरावर आला होता. आजच्या नंतर पुन्हा सतरा वर्षांनी 11 सप्टेंबर 2035 रोजी मंगळ  पृथ्वीच्या जवळ 5 कोटी 69 लक्ष किलोमीटर अंतरावर येणार आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगळ ग्रहाकडे पाठवलेले मंगळयान 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळग्रहाकडे पोहोचले होते असेही श्री. सोमण यांनी सांगितले. 

टॅग्स :मंगळ ग्रह