बाप्पांच्या परदेशवारीला सुरुवात

By Admin | Updated: May 9, 2015 22:48 IST2015-05-09T22:48:17+5:302015-05-09T22:48:17+5:30

विघ्नहर्ता, बच्चे कंपनीचा माय फ्रेंड गणेशा, सर्वांचा लाडका गणपती बाप्पा आपल्या भक्तगणांच्या ओढीसाठी विदेशी निघाला आहे. पेणच्या कला केंद्रात मागणी केलेल्या

The opening of the father's foreign country | बाप्पांच्या परदेशवारीला सुरुवात

बाप्पांच्या परदेशवारीला सुरुवात

दत्ता म्हात्रे, पेण
विघ्नहर्ता, बच्चे कंपनीचा माय फ्रेंड गणेशा, सर्वांचा लाडका गणपती बाप्पा आपल्या भक्तगणांच्या ओढीसाठी विदेशी निघाला आहे. पेणच्या कला केंद्रात मागणी केलेल्या ४००० गणेशमूर्ती बॉक्स पॅकिंगसह, फिजी, कॅनडा, अमेरिका, मॉरिशस, सिंगापूर या देशांत रवाना होणार असून येत्या पाच दिवसांत बाप्पांची ही परदेशवारी सुरू होणार असल्याची माहिती कला केंद्राचे मूर्तिकार सचिन समेळ यांनी दिली. यंदा बाप्पांचे आगमन अधिक मासामुळे २० दिवस उशिराने होणार असल्याने मूर्तिकारांना थोडा अधिक अवधी मिळणार आहे.
दरवर्षी बाप्पाच्या मेगा उत्सवामुळे परदेशी फॅनमध्ये होणारी वाढ मूर्तिकलेच्या आर्थिक स्थैर्याला चालना मिळवून देते. पेणची गणेशमूर्तीकला जगभरात विख्यात असल्याने पेणचेच बाप्पा पाहिजेत, अशी गणेशभक्तांची मनोमन इच्छा असते. बाप्पांच्या उत्सवाच्या इव्हेंटची अपटूडेट माहिती सीडीजद्वारे परदेशस्थ गणेशभक्तांना मिळत असते. एवढी लोकप्रियता मिळविणारे श्रीगणेशाचे भावणारे लोभस रुपडं मूर्तिकलेच्या माध्यमातून मूर्तिकार देव आणि भक्त यांच्यामधील दुवा साधणारा समन्वयक ठरतो. जगाच्या पाठीवर कलेला मरण नसतं.
आंबेघर - पेण येथील कार्यशळा वजा गोडाऊनच्या प्रशस्त जागेत या गणेशमूर्तींची बॉक्स पॅकिंग पूर्ण झाली असून बाप्पांच्या परदेशवारीची तयारी १५ मे पासून सुरू होणार आहे. परदेशस्थ बाप्पाच्या फॅनला वेळवर पूजनासाठी मूर्ती मिळावी, यासाठी मूर्तीकारांची धावपळ सुरू आहे.

Web Title: The opening of the father's foreign country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.