ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ओपीडी ऑन व्हील्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:32 IST2021-02-05T04:32:26+5:302021-02-05T04:32:26+5:30

मुंबई : ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, दिव्यांग यासारख्या व्यक्तींना त्यांच्या घरातच आरोग्य सेवा आणि आरोग्य सल्ला देणे आवश्यक आहे. ...

OPD on Wheels for Senior Citizens | ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ओपीडी ऑन व्हील्स’

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ओपीडी ऑन व्हील्स’

मुंबई : ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, दिव्यांग यासारख्या व्यक्तींना त्यांच्या घरातच आरोग्य सेवा आणि आरोग्य सल्ला देणे आवश्यक आहे. अशा नागरिकांपर्यंत पोहोचणे हेच ध्येय असल्याचे सांगत पालिका प्रशासनाने फिरते दवाखाने साधन सामग्रीबरोबरच, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी यासह सुसज्ज आणि प्राथमिक आरोग्य सेवांच्या आवश्यकतेनुसार परिपूर्ण असतील. त्यामुळे शहर व पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांसाठी ओपीडी ऑन व्हील्स संकल्पनेनुसार प्रत्येकी एक मोबाइल व्हॅन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक आवश्यक तपासण्या घरातच करण्यासाठी युनानी, आयुर्वेद यासारख्या इतर औषधोपचार पध्दतीचा वापर करण्यासाठी धोरण राबवण्याबाबत प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी अर्थसंकल्पात ग्वाही दिली आहे. यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबईतील १ कोटी नागरिकांचे लसीकरण

कोविड लसीकरणाची मोहीम सध्या सुरू असून लस सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार लसीकरण मोहीम राबवून मुंबईतील किमान एक कोटी नागरिकांचे कोविड लसीकरण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. तसेच संसर्गजन्य रोग असलेल्या क्षयरोग, एड्स, आणि वेक्टर जनित रोग असे मलेरिया, डेग्यू व लेप्टोस्पायरेसिस याकरता २०३० पर्यंत सर्व बालकांचे १०० टक्के लसीकरण करण्याचे लक्ष्य असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जन्म-मृत्यू दस्तऐवजाचे डिजिटल स्कॅनिंग

जन्म-मृत्यू दस्तऐवजाचे डिजिटल स्कॅनिंग करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यानुसार ५० हजार दस्तऐवजांच्या पथदर्शक प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. त्याकरिता २०२१-२२च्या अर्थसंकल्पात दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

कस्तुरबा रुग्णालयाचे नूतनीकरण

संसर्गजन्य रोगांचा सामना करण्यासाठी कायमस्वरूपी क्षमतावृद्धी करण्याच्या दृष्टीने कस्तुरबा रुग्णालय येथील विद्यमान विभाग क्रमांक १३ व १५ यांचा समावेश करण्याकरिता नवीन इमारत बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.

Web Title: OPD on Wheels for Senior Citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.