अस्वच्छता करणारे फक्त साडेतीनशे
By Admin | Updated: October 14, 2014 00:43 IST2014-10-14T00:43:55+5:302014-10-14T00:43:55+5:30
स्वच्छ भारत अभियानांतर्गत 2 ऑक्टोबर रोजी देशभर स्वच्छ अभियान राबवण्यात आले.

अस्वच्छता करणारे फक्त साडेतीनशे
मुंबई : स्वच्छ भारत अभियानांतर्गत 2 ऑक्टोबर रोजी देशभर स्वच्छ अभियान राबवण्यात आले. या अभियानांतर्गत रेल्वे पोलीस (आरपीएफ) आणि टीसींमार्फत रेल्वे स्थानकांवर अस्वच्छता पसरवणा:या प्रवाशांविरोधात विशेष मोहीम घेऊन कारवाई करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे अभियानास 2 ऑक्टोबरआधीच सुरुवात करण्यात आली आहे. 20 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर्पयत करण्यात आलेल्या कारवाईत मध्य रेल्वेवर अस्वच्छता पसरवणा:या केवळ 351 जणांना पकडण्यात आले आहे.
देशभरात स्वच्छता अभियान राबवताना रेल्वे स्थानकांवरही स्वच्छता अभियान राबवण्यात आले. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त देशभर अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून जय्यत तयारी करण्यात आली. त्या वेळी स्थानकांवर अस्वच्छता पसरवणा:यांविरोधात कारवाईच्या रेल्वे पोलिसांना (आरपीएफ) आणि टीसींना सूचनाही करण्यात आल्या. यासाठी विशेष मोहीमही उघडण्यात आली. मुळात त्याआधीही रेल्वे पोलीस आणि टीसींकडून अस्वच्छता पसरवणा:या प्रवाशांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली होती. तसे केंद्राकडून आदेशच होते. त्यानुसार रेल्वे मंत्रलयाकडूनही ही मोहीम आधीच सुरू करण्यात. रेल्वे पोलीस आणि टीसींकडून 20 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर्पयत करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 351 प्रवाशांविरोधात कारवाई केली. त्यांच्यावरील कारवाईतून 74 हजार 235 रुपये दंड वसूल करण्यात आला. (प्रतिनिधी)
यात रेल्वे पोलिसांकडून (आरपीएफ) स्वतंत्रपणो करण्यात आलेल्या कारवाईत 289 जणांना पकडण्यात आले. त्यांना न्यायालयाने ठोठावलेल्या दंडातून 53 हजार 680 रुपये दंड मिळाला. तर रेल्वे पोलीस आणि टीसी यांनी संयुक्त मोहीम उघडून केलेल्या कारवाईत 62 प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्यावर केलेल्या दंडात्मक कारवाईतून 20 हजार 555 रुपये दंड मिळाल्याचे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आलोक बोहरा यांनी सांगितले.