साई प्रेरणा इमारतीच्या पिलरची फक्त डागडुजी

By Admin | Updated: July 4, 2015 01:24 IST2015-07-04T01:24:20+5:302015-07-04T01:24:20+5:30

कामोठे वसाहतीमधील साई प्रेरणा बिल्डिंगच्या पिलरला सिमेंटची मलमपट्टी करण्यास सुरु वात झाली आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिक त्या पलीकडे काहीही करून देण्यास तयार नसल्याचे

The only repair of the pillar of the Sai Inspiron building | साई प्रेरणा इमारतीच्या पिलरची फक्त डागडुजी

साई प्रेरणा इमारतीच्या पिलरची फक्त डागडुजी

कळंबोली : कामोठे वसाहतीमधील साई प्रेरणा बिल्डिंगच्या पिलरला सिमेंटची मलमपट्टी करण्यास सुरु वात झाली आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिक त्या पलीकडे काहीही करून देण्यास तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र या इमारतीचे स्ट्रक्चर आॅडिट केल्यानंतरच पुढील निर्णय घ्यावा, असे पोलिसांनीसुद्धा सिडकोला कळविले आहे. मात्र सिडकोकडूनही या प्रकरणी फारसे गांभीर्य दाखविण्यात आलेले नाही.
सेक्टर-२१ येथे भूखंड क्र मांक १७३ आणि १७४ वर साई गृह बिल्डरने चार मजल्यांची इमारत २०१०मध्ये बांधली. २०१०मध्ये १२ सदनिकाधारक आणि सहा गाळेधारकांना ताबा देऊन बिल्डर मोकळा झाला. त्याचबरोबर त्याने अभिहस्तांतरण आणि सोसायटी हस्तांतरित करून काढता पाय घेतला. मागील आठवड्यात गुरुवारी सकाळी गेटसमोरील पिलरला तडे जाऊन प्लास्टर निघाले. काही गजांवर तो पिलर उभा राहिला. त्यानंतर एन.के. जैन या अभियंत्याने पाहणी करून बांधकामाकरिता कमी सिमेंट वापरले असल्याचा निष्कर्ष लावला. बाजूलाच असलेल्या तिरुपती अपार्टमेंटमध्ये या कुटुंबांची राहण्याची तात्पुरती सोय करण्यात आली आहे.
बांधकाम व्यावसायिक सुनील पटेल व ठेकेदार सुरेश पटेल या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. या दोघांनाही जामीन मंजूर झाला असून, आता त्या पिलरला प्लास्टर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ही बिल्डिंग धोकादायक झाली असल्याने ती जमीनदोस्त करून नवीन बांधकाम करून द्यावे, अशी रहिवाशांची मागणी आहे. (वार्ताहर)

Web Title: The only repair of the pillar of the Sai Inspiron building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.