एकतर्फी प्रेमातून मुलीवर चाकूहल्ला!
By Admin | Updated: August 6, 2014 03:14 IST2014-08-06T03:14:42+5:302014-08-06T03:14:42+5:30
प्रेमाला नकार देणा:या 17वर्षीय मुलीवर चाकूहल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवारी चेंबूर येथे घडली.

एकतर्फी प्रेमातून मुलीवर चाकूहल्ला!
मुंबई : प्रेमाला नकार देणा:या 17वर्षीय मुलीवर चाकूहल्ला करण्यात आल्याची घटना मंगळवारी चेंबूर येथे घडली. घटनेनंतर हल्ला करणा:या आरोपीनेदेखील 23 मजल्यांच्या इमारतीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. आरसीएफ पोलिसांनी या आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
चेंबूरच्या वाशीनाका परिसरात ही घटना आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. येथील अयोध्यानगरात ही पीडित मुलगी तिच्या आई-वडिलांसोबत राहते. 12वीमध्ये शिकणा:या या मुलीवर याच परिसरात राहणारा अजय धोतरे (22) हा एकतर्फी प्रेम करीत होता. त्याने अनेकदा या मुलीकडे प्रेम व्यक्त केले. मात्र मुलीने त्याला नेहमीच नकार दिला होता. दोन दिवसांपूर्वीदेखील या आरोपीने पुन्हा एकदा या मुलीला भेटून बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने त्याला भेटण्यास आणि त्याच्यासोबत बोलण्यास पूर्णपणो नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या अजयने या मुलीला जिवे मारून स्वत:ही आत्महत्या करायचे ठरवले. त्यानुसार आज सकाळपासूनच तो या मुलीच्या घराकडे फे:या मारत होता. कॉलेजला जात असतानाच तिच्यावर हल्ला करायचा असा बेत त्याने आखला होता. मात्र आज या मुलीची तब्येत ठीक नसल्याने ती कॉलेजला गेलीच नाही. त्यामुळे ती आज घरात एकटीच होती. हीच संधी साधत अजय चाकू घेऊन या मुलीच्या घरात घुसला. तेव्हाही या मुलीने त्याचा प्रेमाला पुन्हा नकार देताच खिशामधील चाकू त्याने बाहेर काढला आणि तिच्या गळ्यावर वार करीत पळ काढला. मुलीने आरडाओरडा केल्याने शेजा:यांनी तेथे धाव घेतली. या वेळी ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. शेजा:यांनी तत्काळ ही बाब तिच्या कुटुंबीयांच्या कानावर घालत तिला चेंबूरच्या इनलॅक्स रुग्णालयात दाखल केले. तेथे तिच्यावर शस्त्रक्रिया केली असून, सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे.
आरोपीचा शोले ड्रामा
दोन महिन्यांपूर्वीदेखील या तरुणाने मुलीला रस्त्यात गाठून वाद घातला होता. ही बाब मुलीच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनी त्याला दम दिला होता. या भीतीने त्याने हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती परिसरातील काही स्थानिकांनी दिली. आजही या आरोपीने या मुलीवर वार केल्यानंतर तिचे नातेवाईक व पोलीस मारतील या भीतीने तो याच परिसरातील म्हाडाच्या इमारतीवर चढला. इमारतीच्या 23 व्या मजल्यावरून तरुण आत्महत्येचा प्रयत्न करीत होता. मात्र ही बाब त्याच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनी त्याला खाली येण्याची विनवणी केली. मात्र त्यास त्याने नकार दिल्याने काही रहिवाशांनी ही बाब पोलिसांना सांगितली. पोलिसांनी अग्निशामक दलाच्या मदतीने या तरुणाला खाली आणले. दोन ते अडीच तास हा ड्रामा सुरू होता. त्यामुळे या इमारतीच्या खाली नागरिकांची गर्दी झाली होती. अखेर पोलिसांनी त्याला गाडीत टाकून पोलीस ठाण्यात नेले. (प्रतिनिधी)
पीडित मुलीला चेंबूरच्या इनलॅक्स रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली असून, सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.