अर्ज भरण्यास केवळ चार दिवस!
By Admin | Updated: September 15, 2014 23:15 IST2014-09-15T23:15:04+5:302014-09-15T23:15:04+5:30
विधानसभा निवडणुकीकरिता इच्छुकांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी सुमारे सात दिवसांची मुदत दिली आहे.

अर्ज भरण्यास केवळ चार दिवस!
सुरेश लोखंडे ल्ल ठाणो
विधानसभा निवडणुकीकरिता इच्छुकांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी सुमारे सात दिवसांची मुदत दिली आहे. परंतु, यादरम्यान सुमारे तीन दिवस पितृपक्षाचा कालावधी राहणार असल्यामुळे उमेदवारी अर्ज घेण्यासह तो भरण्याची हिम्मत कोणत्याही इच्छुकाकडून होण्याची शक्यता नाही. यामुळे उर्वरित 24 ते 27 सप्टेंबर या केवळ चार दिवसांच्या कालावधीत ठाणो जिल्ह्याच्या 18 विधानसभा मतदारसंघांसह राज्याच्या 288 मतदारसंघांत उमेदवारी अर्ज मोठय़ा संख्येने दाखल केले जाणार आहेत.
महाराष्ट्र पुरोगामी असला तरी पितृपक्षाच्या कालावधीत शुभकार्याचा मुहूर्त करण्याची हिम्मत फारशी कोणी करीत नाही़ किंबहुना, त्याची चर्चादेखील केली जात नाही. यानुसार, कोणताही राजकीय पक्ष त्यांच्या उमेदवारांच्या नावांची चर्चा करताना दिसत नसल्याने उमेदवारी याद्या तर अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आल्या आहेत. यावरून, जुन्या चालीरीती, रूढी-परंपरा आजही तितक्याच तीव्रतेने जाणवत असल्याचे यावरून उघड झाले आहे.
शनिवारपासून (2क् सप्टेंबर) नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची घोषणा आधीच करण्यात आली आहे. पण, शनिवार असल्यामुळे कोणी अर्जदेखील घेणार नाही. यानंतरचा दुसरा दिवस रविवार आहे. उर्वरित, 22 व 23 सप्टेंबर हे दोन दिवस पितृपक्षात येत असल्यामुळे त्या दिवशीदेखील कोणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास धजावणार नसल्याचे राजकीय वतरुळात ऐकायला मिळत आहे. यानंतरचा पुढील काळ मात्र शुभ मानला जाणार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना सत्तेचे डोहाळे लागणार आहेत. त्या दृष्टीने उमेदवारांची यादी जाहीर करण्यासह नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या कालावधीतच शक्ती प्रदर्शनाला प्रारंभ होणो शक्य आहे.
जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. या जिल्ह्यात आता सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असल्यामुळे ठाणो जिल्ह्यात 18 विधानसभा मतदारसंघ शिल्लक राहिले आहेत. त्यातील सुमारे 59 लाख मतदार आपल्या उमेदवारांचे भवितव्य निश्चित करणार आहेत. त्यासाठी लवकरच उमेदवारी निश्चित होणार आहे. अर्ज दाखल करण्यासह प्रचारासाठी इच्छुकांना पितृपक्षामुळे अत्यल्प काळ मिळाला असला तरी त्यावर मात करून उमेदवारांची विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू होणार, यात शंका नाही.