मुंबई : मोबाइलवरून ऑनलाइन शॉपिंग करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडल्याची घटना समोर आली आहे. खार पश्चिमेतील खार दांडा परिसरात राहणाऱ्या साहिल शेख याच्यासोबत ही फसवणूक घडली असून, अज्ञात व्यक्तींनी ऑनलाइन खरेदीच्या नावाखाली त्याच्याकडून तब्बल ५५ हजार ६५ रुपये उकळले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, साहिल शेख याने ९ नोव्हेंबर २०२५ रोजी एका ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून एक स्लीपर आणि शूजची ऑर्डर दिली होती. ऑर्डर दिल्यानंतर काही वेळातच साहिलला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला संबंधित कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगत, “तुमची ऑर्डर होल्डवर आहे. ती कन्फर्म करण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल,” असे सांगितले.
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
आरोपीने कारणे सांगत पैसे उकळले
यानंतर आरोपीने विविध कारणे सांगत साहिलकडून वेगवेगळ्या टप्प्यांवर पैसे भरण्यास भाग पाडले. कधी ऑर्डर कन्फर्मेशन फी, कधी रिफंड प्रोसेस, तर कधी तांत्रिक अडचणीचे कारण देत ऑनलाईन ट्रान्सफरद्वारे रक्कम मागण्यात आली. आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून साहिलने वेळोवेळी पैसे पाठवले. काही वेळातच त्याच्या खात्यातून एकूण ५५,०६५ रुपये गेल्याचे त्याच्या लक्षात आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साहिलने संबंधित वेबसाइटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. तसेच, ज्या क्रमांकावरून फोन आला होता तो क्रमांकही बंद लागल्याने साहिलला आपली फसवणूक झाल्याची खात्री पटली.
यानंतर साहिलने खार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना ऑनलाइन खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून, अनोळखी फोन कॉल्स, लिंक किंवा पैशांची मागणी आल्यास त्याला बळी न पडण्याचा सल्ला दिला आहे.
Web Summary : Mumbai man lost ₹55,000 after ordering shoes online. Scammer posing as company rep claimed order was on hold, tricking him into transferring money for fake fees and technical issues. Police are investigating the cyber fraud.
Web Summary : मुंबई में एक शख्स को ऑनलाइन जूते ऑर्डर करना महंगा पड़ गया। कंपनी का प्रतिनिधि बनकर एक ठग ने ऑर्डर होल्ड होने का बहाना बनाकर उससे फर्जी शुल्क और तकनीकी समस्या बताकर ₹55,000 ठग लिए। पुलिस साइबर धोखाधड़ी की जांच कर रही है।